Theaters Condition : 'नाट्यगृह स्वच्छ असावं असं आम्हाला वाटतं पण...' अभिनेत्री पर्ण पेठे काय म्हणाली?

रत्नागिरीमध्ये भरत जाधवच्या तू तू मी मी नावाच्या नाटकाचा प्रयोग होता यावेळी देखील भरतनं तिथल्या थिएटरमधील गैरसोयींचा पाढा प्रेक्षकांसमोरच वाचला.
Parna Pethe
Parna Pethe

Parna Pethe Matathi Actress comment on Drama Theaters : मराठी प्रेक्षकांना नाट्यगृहामध्ये ज्या समस्यांना सामोरे जावे लागते आता त्याविषयी मराठी कलाकारांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. यापूर्वी प्रसिद्ध कलाकार भरत जाधवनं यावरुन दिलेली प्रतिक्रिया खूप काही सांगून जाणारी होती. त्यानं सकाळला दिलेल्या मुलाखतीमध्ये नाट्यगृहाविषयी परखडपणे प्रतिक्रिया दिली होती.

राजकारण्यांना लाज वाटायला हवी. अशा शब्दांत भरत जाधवनं राजकारण्यांवर आगपाखड केली होती. त्यानंतर वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. काल रत्नागिरीमध्ये भरत जाधवच्या तू तू मी मी नावाच्या नाटकाचा प्रयोग होता यावेळी देखील भरतनं तिथल्या थिएटरमधील गैरसोयींचा पाढा प्रेक्षकांसमोरच वाचला. आणि यापुढे आपण काहीही झाले तरी रत्नागिरीमध्ये पुन्हा पाऊल ठेवणार नाही. असे म्हटले.

आता प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठेनं इंस्टा लाईव्ह करत एका वेगळ्या विषयाविषयी सांगितले आहे. तिनं म्हटलं आहे की, नाट्यगृह स्वच्छ असावं असं आम्हाला आणि प्रेक्षकांना वाटतं..आमच्या चारचौघी नाटकाचा आज विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये प्रयोग होणार आहे. वाशीमधल्या या नाट्यगृहात आम्हाला प्रयोग करायला नेहमीच आनंद होतो. तिथली स्वच्छताही चांगली आहे. यावेळी या लाईव्हमध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे हिनं देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे.

Parna Pethe
Prashant Damle Interview: नाट्यगृह कसं असाव हे आम्हाला जास्त कळतं - प्रशांत दामले

गेल्या काही दिवसांपासून मराठी नाट्यगृहांचा प्रश्न ऐरणीवर येताना दिसतो आहे. त्याच्याविषयीच्या बातम्या, फोटो आणि व्हिडिओ सातत्यानं व्हायरल होताना दिसत आहे. अशावेळी मराठी कलाकारांनी देखील आक्रमक भूमिका घ्यावी अशी मागणी सोशल मीडियातून होताना दिसते आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रशांत दामले यांनी देखील या समस्यांसाठी तातडीनं पावले उचलणार असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com