Shahrukh Khan:तिसऱ्या दिवशी बॉक्सऑफिसवर सुस्तावला 'पठाण'..तोडू नाही शकला 'बाहुबली 2','दंगल' चा 'हा' रेकॉर्ड Pathaan Boxoffice collection | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shah rukh Khan

Shahrukh Khan:तिसऱ्या दिवशी बॉक्सऑफिसवर सुस्तावला 'पठाण'..तोडू नाही शकला 'बाहुबली 2','दंगल' चा 'हा' रेकॉर्ड

Shahrukh Khan: शाहरुख खानचा 'पठाण' सिनेमाचा जलवा रिलीजनंतर तिसऱ्या दिवशी थोडा थंड पडला आहे.अंदाज लावला जात आहे की त्या दिवशी सुट्टी नसल्यानं सिनेमाचं नुकसान झालं आहे. रिलीज झाल्यापासनं बॉक्सऑफिसवर कमाईचा धमाका करणारा 'पठाण' सिनेमा तिसऱ्या दिवशी २०० करोडचं कलेक्शन करेल असा अंदाज वर्तविला जात होता,पण तसं घडलं नाही.

'पठाण' च्या तिसऱ्या दिवशीचा कमाईचा आकडा समोर आला आहे. ट्रेड एनलिस्ट रमेश बालाच्या म्हणण्यानुसार , या सिनेमानं भारतात ३४ करोड ते ३६ करोडची कमाई केली आहे. ही कमाई दुसऱ्या सिनेमांच्या तुलनेत खूपच कमी आहे.

बोललं जात होतं की आपल्या तिसऱ्या दिवशीच्या कमाईसोबत 'पठाण' नवीन रेकॉर्ड बनवेल आणि 'बाहुबली २', 'केजीएफ २' आणि 'दंगल' सारख्या सिनेमाच्या तिसऱ्या दिवशीच्या रेकॉर्डला एका दमात तोडून टाकेल. पण आता कळतंय की हा चमत्कार घडवून आणण्यात 'पठाण'ला अपयश आलं आहे.

शुक्रवारी २७ जानेवारीला सुट्टी नव्हती,यामुळे बॉक्सऑफिसवर शाहरुख खानच्या 'पठाण'ची घोडदौड अचानक मंदावली. दुसऱ्या सिनेमांविषयी बोलायचं झालं तर रणबीरच्या 'संजू' नं तिसऱ्या दिवशी ४६.७१ करोड,'बाहुबली २' ने ४६.५ करोड,'केजीएफ २' ने ४२.९ करोड, 'टायगर जिंदा है' ने ४५.५३ करोड आणि 'दंगल'ने ४१.३४ करोड बॉक्सऑफिसवर कमवले होते. आता हे ही खरंय की या सगळ्या सिनेमांच्या रिलीज नंतर तिसऱ्या दिवशी सुट्टी आली होती.

शाहरुखनं 'पठाण' च्या माध्यमातून गेल्या तीन दिवसांत अनेक रेकॉर्ड बनवले आहेत. यशराज सिनेमाच्या बॅनर अंतर्गत 'पठाण' ने बॉक्स ऑफिसवर रिलीजनंतर तब्बल २१ रेकॉर्ड बनवत इतिहास रचला आहे. अर्थात सिनेमाच्या इतिहासात याचा उल्लेख पुढे नक्कीच केला जाईल. या सिनेमानं पहिल्या दिवशी ५४ करोडची कमाई केली. तर वर्ल्डवाईड कलेक्शन तब्बल १०० करोड इतकं होतं.

दुसऱ्या दिवशी पठाणने भारतीय बॉक्सऑफिसवर ७० करोडची कमाई केली आणि जगभरात तब्बल २०० करोडचा आकडा पार केला. आणि यासोबतच भारतीय सिनेमाच्या इतिहासात या सिनेमाचा रिलीज दिन आणि त्याचा पुढील दिवस 'हायेस्ट ग्रेसिंग डे' म्हणून नोंदवला गेला आहे.

कोव्हिड १९ नंतर 'पठाण' पहिला हिंदी सिनेमा आहे ज्यानं लागोपाठ हायेस्ट ग्रेसिंग ओपनिंग केली आहे. भारतीय सिनेमाच्या इतिहासत दुसऱ्या दिवशी सर्वात अधिक कामई करणारा सिनेमा देखील 'पठाण' बनला आहे.

अजूनही अपेक्षा केली जाऊ शकते 'पठाण' कडून,कारण अजून दोन वीकेन्ड समोर आहेत आणि यामुळे पुन्हा 'पठाण' सुळकी मारुन वर येऊ शकतो.