Pathaan OTT Release: शाहरुख खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, या दिवशी चित्रपट ओटीटीवर करणार धमाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pathaan Movie

Pathaan OTT Release: शाहरुख खानच्या चाहत्यांची प्रतीक्षा संपली, या दिवशी चित्रपट ओटीटीवर करणार धमाल

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर 'पठाण', 2023 सालचा पहिला मेगा ब्लॉक बस्टर, थिएटरमध्ये रिलीज होऊन 7 आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे, तरीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे.

स्पाय-थ्रिलर चित्रपट तिकीट खिडकीवर रेकॉर्ड तोडत आहे. त्याचवेळी, OTT वर हा चित्रपट प्रदर्शित होण्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'पठाण' 22 मार्च 2023 रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे.

शाहरुख खानचा कमबॅक ब्लॉकबस्टर चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 22 मार्च रोजी OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. प्राइम व्हिडिओने आपल्या इन्स्टाग्राम पेजवरही चित्रपटाचे पोस्टर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.

'पठाण' हा यशराज बॅनरच्या स्पाय युनिव्हर्सचा भाग आहे. चित्रपटाच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान व्यतिरिक्त दीपिका पादुकोण, जॉन अब्राहम, डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनीही 'पठाण'मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. 'पठाण'मध्ये सलमान खानचाही कॅमिओ आहे.