Pathaan: आज साजरा होतोय 'पठाण डे', ज्यांचा पाहायचा राहिलाय त्यांनी बघून घ्या, तिकीट फक्त.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pathaan, shah rukh khan, pathaan day

Pathaan: आज साजरा होतोय 'पठाण डे', ज्यांचा पाहायचा राहिलाय त्यांनी बघून घ्या, तिकीट फक्त..

Pathaan Shah Rukh Khan: शाहरुखचा पठाण सिनेमा सुपरडुपर हिट झालाय. ५०० कोटी क्लबमध्ये दाखल होणार पठाण हा पहिला सिनेमा आहे. पठाणमुळे शाहरुखच्या गेल्या काही वर्षातल्या फ्लॉप करियरला पुन्हा एकदा सुपरहिट बूस्टर मिळाला आहे.

पठाण मुळे शाहरुख प्रचंड आनंदात आहे. शाहरुखने पठाण हिट झाल्यावर प्रेस कॉन्फरन्स घेतली होती.

पठाण हा शाहरुख, जॉन, दीपिका या तिघांच्या आयुष्यातला ब्लॉकबस्टर सिनेमा ठरलाय. पठाण ज्यांनी पाहिला नाही त्यांच्यासाठी मोठी बातमी आहे.

('Pathan Day' is being celebrated today, those who want to see Pathan, go see it, ticket only rs......)

पठाण आजवर अनेकानी पाहिलाय. पण ज्यांना पठाण पाहता आला नाही त्यांच्यासाठी खुशखबर अशी ती म्हणजे.. पठाणचं तिकीट आज फक्त ११० रुपयांना मिळणार आहे. आज यशराज फिल्म्स तर्फे देशभरात पठाण डे साजरा होतोय.

त्यानिमित्ताने पठाणचं तिकीट आज सगळीकडे फक्त ११० रुपयांना मिळणार आहे. त्यामुळे आज स्वस्तात मस्त पैशात तुम्हाला पठाण सारखा सुपरहिट सिनेमा पाहता येईल.

शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांची प्रमुख भूमिका असलेला पठाण सिनेमा जगभरात नावाजला जातोय. शाहरुखच्या फॅन्सनी पठाणचं खुप कौतुक केलंय.

याशिवाय एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर अनेकदा थिएटरमध्ये जाऊन शाहरुखच्या फॅन्सनी पठाण बघितलाय. पठाण ५०० कोटी क्लब मध्ये दाखल झालेला पहिला सिनेमा ठरलाय.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पठाण आवडला असून त्यांनी संसदेत सर्वांसमोर पठाणचं कौतुक केलंय.

शाहरुखचा पठाण एक ऐतिहासिक सिनेमा ठरलाय. पठाण निमित्ताने काश्मीर मधील श्रीनगर येथील INOX राम मुन्शी बाग थियेटर तब्बल ३२ वर्षांनी हाउसफुल झालं. पठाण पाहण्यासाठी काश्मीर मधील नागरिकांनी ३० वर्षांनंतर हाऊसफुल्ल गर्दी केली. काश्मीर सारख्या संवेदनशील ठिकाणी पठाण हाऊफुल्ल होणं हि फार मोठी गोष्ट होती.

शाहरुख खानने पठाण निमिताने ४ वर्षांनंतर हिंदी इंडस्ट्रीत कमबॅक केलंय. शाहरुखच्या पठाण सिनेमाचं अनेक कलाकार तोंड भरून कौतुक करत आहेत.

२५ जानेवारीला रीलीज झालेला पठाण शाहरुख खानच्या करीयरमधला अत्यंत महत्वाचा सिनेमा आहे. आज फक्त ११० रुपये तिकीट असल्याने पठाण पुन्हा एकदा हाऊसफुल्ल गर्दी करेल यात शंका नाही