' तु जशी आहेस, तशी मला पसंद आहे ' एजाजचं पवित्राला प्रपोझ

सकाळ ऑनलाईन टीम
Saturday, 9 January 2021

बिग बॉसच्या घरात मागील आठवड्यात काही स्पर्धकांच्या घरच्यांनी भेट दिली होती. त्यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले होते.

मुंबई - भारतीय टेलिव्हिजनवर लोकप्रियताचा नवा विक्रम करणा-या बिग बॉस या मालिकेत दर आठवड्याला व्टिस्ट येत असतात. आता ही मालिका शेवटच्या टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यात सहभागी झालेले कलाकार, त्यांचे आपआपसांतील वाद यामुळे ही मालिका बहुतांशी जणांच्या पसंतीचा विषय ठरताना दिसत आहे. सोशल मीडियावरही त्यातील सहभागी स्पर्धकांना फॉलो करणा-यांची संख्या जास्त आहे.

बिग बॉसच्या घरात मागील आठवड्यात काही स्पर्धकांच्या घरच्यांनी भेट दिली होती. त्यावेळी अनेकांना अश्रु अनावर झाले होते. ब-याच काळानंतर घरच्यांना भेटायला आणि बोलायला मिळाल्यानं स्पर्धकांनी आनंद व्यक्त केला होता. त्यापैकी एजाज आणि त्याची मैत्रीण पवित्रा यांच्या भेटीची चर्चा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे.

 1.  बिग बॉसचा हा आठवडा भलताच इमोशनल होता. एजाजला त्याचा भाऊ भेटायला आला होता. आता त्याला भेटण्यासाठी आणखी एक खास पाहुणी येणार आहे. ती म्हणजे त्याची मैत्रीण आणि बिग बॉस 14 ची स्पर्धक पवित्रा पुनिया.

Image may contain: 1 person

2.  आता नव्यानं जो बिग बॉसचा जो एपिसोड दाखविण्यात येणार आहे त्यात पवित्रा पाहुणी या नात्यानं एजाजला भेटायला जाणार आहे. त्या एपिसोडचा प्रोमो व्हायरल झाला आहे. तिची भेट पवित्राशी झाली आहे असे या भागात दाखविण्यात आले आहे.

Image may contain: 1 person, closeup

3. पवित्राला पाहता क्षणी एजाजचा चेहरा उजळून निघाला आहे. तिला पाहिल्यानंतर त्यानं आनंद व्यक्त केला आहे. तो पळतच तिला भेटायला गेला. पवित्रा रस्ता चुकल्यानंतर काचेच्या पडद्याआडून बोलायचे असते याचा विसर एजाजला पडला होता.

Image may contain: 2 people, people sitting

4. दोघेही फोनवर गप्पा मारत असून यावेळी एजाज तिला म्हणतो की, तुझ्याशी बोलण्यासाठी मी खूप तडफडतो. तुझ्यासोबत आयुष्य घालविण्यासाठी मी तयार आहे. यावर पवित्रा त्याला विचारते, खरचं जमेल का तुला, यावर एजाज एकदा हो तर म्हण. असे बोलताना दिसत आहे.

Image may contain: one or more people

5. एजाज पवित्राच्या पुढे आपल्या प्रेमाची कबूली देतो. यावेळी तो म्हणतो तु जशी आहेस, तशी मला पसंद आहे. पवित्रा जाण्या अगोदर एजाज तिला विचारतो की, तु माझ्यावर प्रेम करतेस का, यावर ती म्हणते, खूप प्रेम करते.

Image may contain: 1 person

6. दोघांचा हा रोमँटिक प्रसंग खूप हिट झाला आहे. पवित्रानं सोशल मीडियावर हा प्रसंग व्हायरल केला आहे. त्याला आतापर्यंत एक लाखांपेक्षा अधिक व्हयुज मिळाले आहेत.

Image may contain: one or more people

7. मागील आठवड्यात देखील एजाजनं पवित्राला प्रपोझ केलं होतं. सनी लिओनीच्या येण्यानं मागील आठवडा हिट झाला होता. तिनचं एजाजला आपल्या मनातली गोष्ट सांगण्याचा हट्ट धरला होता.

Image may contain: 1 person

8. एजाज म्हणाला की, माझ्या प्रत्येक श्वासात आता पवित्रा आहे. तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. एजाजच्या या प्रपोझला पवित्रानंही सपोर्ट केलं होतं.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pavitra punia guest bigg boss 14 eijaz khan confesses love to her