अनुराग कश्यपवर पायल घोषने केला बलात्काराचा आरोप, तक्रार दाखल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ | Wednesday, 23 September 2020

पायलने तिच्या लेखी तक्रारीमध्ये अनुराग कश्यप विरोधात अनेक गंभीर आरोप लावले आहेत. पोलिसांनी पायलचा जबाब नोंदवून घेतला आहे.  

मुंबई- दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या  विरोधात लैंगिक शोषण केल्याचा आरोप लावणा-या अभिनेत्री पायल घोषने आता त्याच्या विरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली आहे. मंगळवारी वकिलांसोबत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या पायलने तिच्या लेखी तक्रारीमध्ये अनुराग कश्यप विरोधात अनेक गंभीर आरोप लावले आहेत. पोलिसांनी पायलचा जबाब नोंदवून घेतला आहे.  

हे ही वाचा: अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या अडचणींमध्ये वाढ, जया साहाने एनसीबीसमोर दिली कबुली  

पायल घोषच्या वकिलांनी सांगितलं की 'अनुराग कश्यप विरोधात भादवि कलम ३७६, ३५४, ३४१, ३४२ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.' पायल सोमवारी तक्रार दाखल करण्यासाठी गेली होती मात्र त्यावेळी ती तिला काही कारणास्तव तक्रार दाखल करता आली नाही. रिपोर्ट्सनुसार पोलिस स्टेशनमध्ये महिला पोलिस नव्हती आणि हे प्रकरण कोणत्या पोलिस स्टेशनच्या हद्दीत येतं हे ठरत नसल्याने सोमवारी तक्रार दाखल करता आली नसल्याची चर्चा आहे. 

Advertising
Advertising

अनुराग कश्यपच्या वकिलांनी त्यांच्या वतीने स्टेटमेंट सादर केलं होतं त्यात त्यांनी म्हटलंय की, 'अभिनेत्रीने लावलेले सगळे आरोप चुकीचे आहेत.' तर पायलने अनुराग कश्यप सोबतंच या प्रकरणात इतर अभिनेत्रींची नावं देखील घेतली आहेत. यामध्ये रिचा चढ्ढाचं नाव आल्यानंतर रिचाने पायलविरुद्ध कायदेशीर नोटीस पाठवली होती. तर हुमा खुरेशीने देखील तिचं नाव आल्याने संताप व्यक्त केला आहे.

पायल घोषने दावा केला होता की अनुरागने तिला सांगितलं होतं त्याने २०० पेक्षा जास्त मुलींसोबत संबंध ठेवले आहेत. यात अनुरागसोबत काम केलेल्या अभिनेत्रींच्या नावाचा देखील समावेश आहे. तिने एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं होतं की अनुरागने तिला घरी बोलवून तिच्यासोबत चूकीचं वर्तन केलं होतं.     

payal ghoh files complaint against anurag kashyap in rape charges