पश्चिम बंगालमधील हिंसाचार पाहून ढसाढसा रडली पायल रोहतगी; मोदींना म्हणाली..

प.बंगालच्या विधानसभांच्या निवडणूकांचा निकाल जाहीर झाला. त्यावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली.
payal rohatgi reacted
payal rohatgi reacted Team esakal

मुंबई - पश्चिम बंगालमधील निवडणूकांचे निकाल जाहीर होऊन चार दिवस झाले. त्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाल्याचे दिसून आले. मोठ्या प्रमाणात गोंधळही झाला. यावरुन देशभरातून त्या घटनेचा निषेधही करण्यात आला. आता त्यावरुन बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी त्या घटनेवर परखड प्रतिक्रिया व्यक्त केली होती. अभिनेत्री कंगणानं (kangana ranaut) जे व्टिट केले होते त्यावरुन तिचे व्टिटर अकाऊंट (twitter account) सस्पेंड करण्यात आले. त्यावादात अभिनेत्री पायल रोहतगीनं (payal rohatagi) उडी घेतली आहे. तिची सोशल मीडियावरील पोस्ट सध्या चर्चेचा विषय आहे.

बंगालच्या विधानसभांच्या निवडणूकांचा (west bengal election 2021) निकाल जाहीर झाला. त्यावरुन मोठ्या वादाला सुरुवात झाली. यावरुन अनेक हिंसक घटनाही घडल्या. त्यामुळे त्या निकालाला गालबोट लागले आहे. सध्या पायल रोहतगीचा व्हिडिओ (instagram video) सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पायलनं तिच्या इंस्टावर जो एक व्हिडिओ शेअर केला आहे त्यात ती तो हिंसाचार पाहून ढसढसा रडत असल्याचे दिसून आले आहे. तिनं ती घटना पाहून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (Narendra modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांना केली आहे. तिचा तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

त्या व्हिडिओमध्ये पायल म्हणते, गेल्या काही दिवसांपासून मी फार असहाय्य झाले आहे असे वाटत आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे सध्याची परिस्थिती. आपण स्व;तच सामर्थ्यवान नसू तर दुस-यांना काय सांगणार हा खरा प्रश्न आहे. तुम्ही आतापर्यत माझे प्रभावी व्यक्तिमत्व पाहिले आहे. मात्र आता मी असहाय्य झाले आहे. ज्यावेळी मला कुणी काही सल्ला देत नाही आणि जेव्हा मी बंगालच्या हिंसाचाराचे फोटो पाहते त्यावेळी मला फार वाईट वाटते. जे काही चाललं आहे ते मला आवडलेले नाही.

payal rohatgi reacted
'रामायणा'तील 'रावणा'च्या निधनाची अफवा; 'लक्ष्मणा'ने लिहिली पोस्ट
payal rohatgi reacted
'छिछोरे'मधील अभिनेत्री अभिलाषा पाटील यांचे कोरोनाने निधन

सध्या सरकार काय करत आहे असा प्रश्न मला पडला आहे. मोदी जी आणि अमित शहा जी आपण या घटनेकडं लक्ष देण्याची गरज आहे. या घटनेत जे दोषी आहेत त्यांच्यावर आपण कारवाई करावी. अशी आपल्याला विनंती आहे. राजकारणाच्या नावावर जे काही चाललं आहे ते योग्य नाही. शहाजी आणि ममता बॅनर्जी या दोघांनीही या गोष्टीची काळजी घ्यायला हवी. असेही पायलनं यावेळी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com