'सलमा 54 ची आहे असं कोण म्हणेल, फोटो पाहा मग कळेल'

सकाळ ऑनलाईन टीम
Tuesday, 26 January 2021

गेल्या काही दिवसांपूर्वी हॉलीवूड अभिनेत्री सलमाचे हॉट फोटोशुट कमालीचे लोकप्रिय झाले आहे.त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत.

मुंबई - सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक अभिनेत्री वेगवेगळ्या प्रकारचे फोटोशपट करताना दिसून येतात. त्यांच्या त्या फोटोंना दर्शकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. काही अभिनेत्री अशा आहेत की ज्यांनी आपले करिअरला रामराम केला आहे मात्र त्यांना सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता कित्येक अभिनेत्रींनी नव्यानं फोटोशुट करण्यास सुरुवात केली आहे. ते पाहिल्यावर त्या अभिनेत्रींनी 60 पार केली आहे हे वाटतही नाही.

सध्या डाएटला  दिले जाणारे महत्व फिटनेसबाबत घेतली जाणारी काळजी यामुळे समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी बॉलीवूडच्या सेलिब्रेटींनी पुढाकार घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हॉलीवूड अभिनेत्री सलमाचे हॉट फोटोशुट कमालीचे लोकप्रिय झाले आहे.त्याला हजारो लाईक्स मिळाले आहेत. सलमा हायकचं बिकिनी फोटोशुट व्हायरल झालं आहे. सध्या सलमाचं वय 54 वर्षे आहे. मात्र तिचे ते बिकीनील फोटो पाहिल्यावर सलमाच्या वयाचा विसर पडल्याशिवाय राहत नाही. 
 
1. सलमानं आपल्या इंस्टावर काही फोटो शेयर केले आहेत. ते कमालीचे हिट झाले आहेत. तिच्या चाहत्यांनी तिला त्यावरुन कमेंटही केल्या आहेत.

May be an image of 1 person and standing

2.  सलमाचा असा आगळा वेगळा लुक तिच्या चाहत्यांना भलताच आवडला आहे. तिनं रेड कलरची मोनोकिनी घातली आहे. आणि ती ओवर वॉटर नेटवर झोपलेली दिसते आहे.

May be an image of 1 person, standing and sunglasses

3. याशिवाय सलमानं बिकीनीमध्येही काही फोटो काढले आहेत. ते तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यावेळी सलमानं काळ्या रंगाची बिकीनी घातली आहे. ज्यात तिनं योगा करतानाची पोझ दिली आहे.

May be an image of 1 person and body of water

4.  सलमानं आपलं फोटोशुट मोठ्या आनंदानं शुट केलं आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी तिनं हे फोटो व्हायरल केल्यानं त्यावर लाईक्स आणि कमेंटसचा पाऊस पडला आहे.

May be an image of 1 person

5. तिचे ते फोटो पाहिल्यावर कोण म्हणणार नाही की सलमाचं वय 54 आहे म्हणून इतकी ती सुंदर दिसते आहे. वयाला लपविण्यासाठी तिनं व्यायामाचा आधार घेतला आहे. त्याचे श्रेय ती योग्य आहार आणि व्यायामाला ती देते. तिच्य़ासाठी वय म्हणजे एक आकडा आहे.

May be an image of 1 person and body of water

6. ज्यापध्दतीनं सलमानं फोटो शेयर केले आहेत त्यावरुन तिचे व्हेकेशन मोठ्या आनंदात गेल्याचे दिसून आले आहे. तिच्या प्रत्येक फोटोला मिळणा-या लाईक्सची संख्याही मोठी आहे.

No photo description available.

7.  पुढील काळात सलमा 'द एटरनल्स' ' चित्रपटात दिसणार आहे. ज्यात प्रख्यात अभिनेत्री एंजेलिना जोली, मॅडेन, कीट हॅरिंग्टन, कुमेल ननजियानी, लॉरेन रॅन्डॉल्फ, ब्रायन टायर हेन्री, बेरी केओघन आणि डॉन दिसणार आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: photo shoot of Hollywood actress Salma Hayek bikini photos goes viral age is just a number