Phulrani
PhulraniGoogle

Phulrani: झगामगा मला बघा..आली रे आली शेवंता आली..'हास्यजत्रा' गाजवणारी 'ही' अभिनेत्री साकारणार 'फुलराणी'

'फुलराणी' सिनेमात कोणती अभिनेत्री दिसणार यावर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. आज त्या अभिनेत्रीचं नाव जाहीर झालं अनं सगळेच अवाक झाले.

Phulrani: ती येणार... ती येणार... असं मागील वर्षभरापासून कानावर येत होतं, उत्सुकता वाढली होती, कुतूहल जागं झालं होतं, पण कोण ती, राणी की महाराणी? छे होSSS, ही तर 'फुलराणी'... बरं ही फुलराणी आहे तरी कोण? याचं आणखी वेगळं कुतूहल. आज अखेर या कुतुहलाचं उत्तर मिळालं आहे.

तुमच्या, आमच्या, सर्वांच्या लाडक्या 'फुलराणी'ची झलक पहायला मिळाली बरं का. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर २२ मार्चला सिनेमागृहात 'फुलराणी' भेटणार आहे, पण त्यापूर्वी आज १३ फेब्रुवारीला 'फुलराणी' प्रत्यक्ष सोशल मीडियावर अवतरली.

सोशल मीडियावर टीझरच्या माध्यमातून 'फुलराणी'चा फर्स्ट लूक रिव्हील करण्यात आला आहे.

Phulrani
MC Stan: 'काय सांगू तुम्हाला..' अन् बिग बॉस विजेता एम सी स्टॅन झाला भावूक..

सुबोध भावे सोबत 'फुलराणी' सिनेमात कोण दिसणार यावरनं अनेक अभिनेत्रींची नावं घेतली जात होती. अर्थात सगळी बडी नावं होती. पण या सगळ्या नावांना छेद देत जे नाव समोर आलं आहे ते कळल्यावर सगळेच अवाक झाले आहेत.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शिनी इंदलकर फुलराणी साकारणार आहे. सोशल मीडियावरील तिचा फर्स्ट लूक सर्वांना भलताच आवडला आहे, त्यात तिच्या तोंडी असलेला 'झगामगा मला बघा,आली रे आली शेवंता आली हा संवाद तर भन्नाटच आहे. प्रियदर्शनीनं सिनेमातही काम केलेलं आहे,

Phulrani
Apurva Nemlekar: 'माझ्या सगळ्या मैत्रिणींना मुलंही झाली आणि मी अजून फक्त..',अपूर्वाच्या मनात काय सलतंय?

प्रियदर्शनी इंदलकरनं याआधी 'सोयरिक','भाऊबळी' सिनेमात काम केलं आहे. 'हास्यजत्रे'च्या माध्यमातून तर ती महाराष्ट्रातील घराघरात ओळखली जातेच. आता 'फुलराणी' नावानं तिला अख्खा महाराष्ट्र काही दिवसांत ओळखेल.

विश्वास जोशी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘फुलराणी...अविस्मरणीय प्रेम कहाणी’ हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. विश्वास जोशी, अमृता राव, श्वेता बापट चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जाई जोशी, श्री.ए.राव, स्वानंद केळकर या चित्रपटाचे निर्माते आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com