निवडणुकीच्या तोंडावर 'पीएम नरेंद्र मोदी'चा ट्रेलर प्रदर्शित (व्हिडिओ)

Vivek Oberai
Vivek Oberai

मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. मोदींच्या लहानपणापासून पंतप्रधानपदापर्यंतचा प्रवास या चित्रपटात दाखविला आहे.

सध्या बॉलिवूडमध्ये अनेकांचे बायोपिक बघायला मिळत आहेत. खेळाडू, ऐतिहासिक व्यक्ती तसेच राजकारणातल्या व्यक्ती अशा अनेकांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहेत. आता यात पंतप्रधान मोदी यांचा बायोपिकचाही समावेश झाला आहे. या चित्रपटात विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारत असून, विवेकचे वेगवेगळे नऊ लूक चित्रपटात आहेत.

नरेंद्र मोदींवरील हा चित्रपट 12 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. या चित्रपटात बरखा बिष्ट ही मोदींच्या पत्नी अर्थात जसोदाबेन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. तर झरीना वहाब मोदींच्या आईंची हीराबेन यांची व्यक्तिरेखा करणार आहे. मनोज जोशी अमित शहा यांच्या भूमिकेत असतील. सुरेश ओबेरॉय आणि संदीप सिंग यांनी या सिनेमाच्या निर्मिती केली आहे. या चित्रपटात मोदींच्या फक्त खासगी आयुष्याबद्दलच लोकांना सांगितले असे नसून एक कार्यकर्ता ते भारताचे पंतप्रधान होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास दाखवण्यात आला आहे. जो देश को चाहते है, वो औऱ कुछ नही चाहते, हिंदुस्तान आतंक से नही, आतंक हिंदुस्तान से डरेगा, असे काही संवाद लक्ष वेधून घेतात. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com