esakal | 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट उद्या प्रदर्शित होणार 
sakal

बोलून बातमी शोधा

Biopic

'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट उद्या प्रदर्शित होणार 

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई : लोकसभा निवडणूकांच्या पाश्वभूमिवर येणार असल्याने 'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपट चांगलाच अडचणीत आला होता. परंतु, आता या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली आहे. या सिनेमाला 'यू' सर्टिफिकेट मिळाले असून, उद्या 11 एप्रिल (गुरुवार) रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या बायोपिकला लोकसभा निवडणुकांतील पहिल्या टप्प्याच्या मतदानाचाच मुहूर्त मिळाला आहे. 

'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित झाला तर त्यामुळे आचारसंहितेचा भंग होईल का? याचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे मत सर्वोच्च न्यायालयाने मांडले होते. तसेच न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेण्याची आवश्यकता नसल्याचेही म्हटले होते.

या चित्रपटात मुख्य भूमिका असलेल्या अभिनेता विवेक ओबेरॉय याने याबाबत ट्विट केले आहे. ''तुमचे आशीर्वाद, पाठिंबा आणि प्रेम यामुळे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जिंकलो. तुमहा सर्वांचे आभार. लोकशाहीवरील विश्वास दृढ केल्याबद्दल भारतीय न्यायव्यवस्थेचे आभार. गुरुवार, 11 एप्रिल. जय हिंद.' असे ट्वीट विवेक ओबेरॉयने केले आहे. विशेष म्हणजे #PMNarendraModiWins असा हॅशटॅगही विवेकने जोडला आहे.

loading image
go to top