शाहरूख, आमीरचा मोदींसोबतचा सेल्फी व्हायरल; वाचा कधी घेतलाय हा सेल्फी

टीम ई-सकाळ
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

नवी दिल्ली : जगभरात यावर्षी महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी केली जात आहे. भारतात ही जयंती कशी साजरी करावी, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडन कलाकारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यात शाहरूख खान, आमीर खान यांच्यासह निर्माते, दिग्दर्शक आणि आघाडीच्या अभिनेत्रींचा सामावेश होता. 

नवी दिल्ली : जगभरात यावर्षी महात्मा गांधी यांची 150वी जयंती साजरी केली जात आहे. भारतात ही जयंती कशी साजरी करावी, याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडन कलाकारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यात शाहरूख खान, आमीर खान यांच्यासह निर्माते, दिग्दर्शक आणि आघाडीच्या अभिनेत्रींचा सामावेश होता. 

काल रात्री दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूडमधील बड्या कलाकारांची विशेष भेट घेतली. त्यात आगामी वर्षात महात्मा गांधी यांची 150वी जयंती कशी साजरी करावी, या विषयी कलाकारांशी चर्चा करण्यात आली. पंतप्रधान मोदींना भेटलेल्या कलाकारांमध्ये आमीरखान, शाहरूख खान, जॅकी श्रॉफ, कंगणा राणावत, जॅकलीन फर्नांडिस, एकता कपूर, सोनम कपूर, साजिद नाडियाडवाला, बोनी कपूर, अनुराग बासू, राजकुमार संतोषी, राजकुमार हिरानी, इम्तियाज अली यांचा समावेश होता. या भेटीनंतर जवळपास सर्व कलाकारांनी पंतप्रधान मोदींसमवेत सेल्फी काढून घेतले. ते सेल्फी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. 

Image

Image

Image

Image

या भेटीबाबत शाहरूख खान म्हणाला, 'आम्ही जे काम करतो तो निव्वळ व्यवसाय नाही. आता आपण देशाला आणि जगाला महात्मा गांधींची नव्याने ओळख करून देण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदींनी आम्हा सगळ्यांना एकत्र आणलं. त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.'

या भेटीविषयी कंगणा म्हणाली, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कला आणि कलाकारांविषयी प्रचंड आस्था आहे. या क्षेत्राची असलेली सुप्त ताकद त्यांच्या इतकी यापूर्वी कोणी ओळखली नाही. मी पंतप्रधान मोदींचे मनापासून आभार मानते.' पहिल्यांदाच आमच्यापेक्षा आमच्या उद्योगाचं महत्त्व जाणणारं कोणी तरी आहे, हे पाहून समाधान वाटलं, असे मत एकता कपूरने व्यक्त केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi interacts with bollywood celebrities to celebrate mahatma gandhi