मोदींनी घेतला 'मन बैरागी' न बघण्याचा निर्णय; दिलं हे कारण!

वृत्तसंस्था
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

'मोदी मन बैरागी हा चित्रपट बघणार नाहीत', असे या चित्रपटाचे सहनिर्माते महावीर जैन यांनी सांगितले. चित्रपटाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत मोदींनी हे चित्रपट बघणार नाही असे सांगितले होते, अशी माहिती जैन यांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी त्यांच्या जीवनावर आधारित 'मन बैरागी' या चित्रपटाचे पोस्टर प्रकाशित करण्यात आले. पुन्हा एकदा मोदींच्या कार्यावर चित्रपट येणार असल्याने प्रेक्षकही उत्सुक आहेत. विशेष म्हणजे या चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी करणार आहेत. या सर्व कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत होता. पण आता मोदींमुळे आता पुन्हा एकदा या चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे.

मोदींवर पुन्हा बायोपिक! हा प्रसिद्ध दिग्दर्शक करणार निर्मिती

'मोदी मन बैरागी हा चित्रपट बघणार नाहीत', असे या चित्रपटाचे सहनिर्माते महावीर जैन यांनी सांगितले. चित्रपटाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या एका मुलाखतीत मोदींनी हे चित्रपट बघणार नाही असे सांगितले होते, अशी माहिती जैन यांनी दिली. 

भन्साळींच्या चित्रपटातील मोदी साकारणारा हा हिरो आहे तरी कोण?

'देशातील प्रभावी व्यक्ती म्हणून मोदींकडे बघितलं जातं. एक चहावाला ते पंतप्रधान असा मोदींचा खडतर प्रवास व लोकांना माहीत नसलेले त्यांचे अनेक पैलू आम्हाला लोकांसमोर आणयचे आहेत. मोदींना स्वतःची केलेली स्तुती आवडत नाही, म्हणून ते हा चित्रपट बघणार नाहीत. हा चित्रपट कोणत्याही व्यावसायिक कमाईासठी नाही तर मोदींचा जीवनपट मांडण्यासाठी आहे,' असे जैन यांनी सांगितले.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PM Narendra modi rejects to watch their biopic Man Bairagi