
अयोध्येतील चौकाचे लता दीदींच्या नावाने होणार नामकरण, योगी आदित्यनाथांची घोषणा
भारताची गानकोकिळा म्हणून जीची चौफेर प्रचिती होती अशी लता दीदी आपल्यात नसल्या तरी तरी त्यांचा गाण्यांचा पगडा आजही देशात बघायला मिळतो.भारताला अनेक गौरवपात्र गाणी लतादीदींनी दिली आहेत.या गानसम्राज्ञीच्या नावाने आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ भल्या मोठ्या रत्याची घोषणा करत असल्याची बातमी पुढे येतेय.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्या प्रशासनाला यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निर्देशात पुढील १५ दिवसांत अयोध्येतील एका मोठ्या चौकाची ओळख करून दिवंगत लता मंगेशकर यांचे नाव देण्यात यावे,(Singer) असे म्हटले आहे. एवढेच नाही तर लताजींनी गायलेली भगवान राम आणि हनुमानाची गाणी आणि भजन शहरात ठीक ठिकाणी स्पीकरवर वाजवावेत.
हेही वाचा: PM Karam Yogi Mandhan Yojana : दरमहा मिळते तीन हजार रुपये पेन्शन
या आदेशानंतर शहरातील ठिकठिकाणच्या परिसरातील माहिती घेणे सुरू झाले आहे.राजजन्मभूमिकडे जाणाऱ्या मार्गावरील अयोध्येतील मुख्य चौकांची निवड करण्यात येणार असल्याचे कळते आहे.अयोध्येचे महापौर हृषिकेश उपाध्याय म्हणाले की, येत्या १० दिवसांत एक जागा निश्चित करण्यात येईल.

गानसम्राज्ञी लता दीदींनी ५० हजाारापेक्षा जास्त गाणी म्हटली होती.त्यांच्या गाण्यांचा संग्रह फार मोठा आहे.त्यांची गाणी कोकीळेच्या आवाजासारखी मधूर होती.त्यामुळे त्यांना भारताची कोकीळा असेही म्हटले जाते.(lata mangeshkar)२००१ मध्ये भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले. तीन राष्ट्रीय पुरस्कार पटकावणाऱ्या लता दीदींच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला होता.लता मंगेशकर यांना २८ दिवस मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच त्यांनी ६ फेब्रुवारीला शेवटचा श्वास घेतला.
Web Title: Pm Yogi Adityanath Announced A Big Roadway On Lata Didis Name
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..