शाहरुख-आर्यन अलिबागमध्ये; पोलिसांनी हटवली 'मन्नत'बाहेरील चाहत्यांची गर्दी

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी गेली 'मन्नत' बंगल्याबाहेर गर्दी
shah rukh aaryan khan
shah rukh aaryan khan

Shah Rukh Khan Birthday बॉलिवूडच्या किंग खानचा आज (२ नोव्हेंबर) वाढदिवस आहे. अनेकदा, शाहरुख खान त्याचा वाढदिवस अलिबागच्या फार्महाऊसवर साजरा करतो. दरवर्षी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याचे चाहते 'मन्नत' या बंगल्याबाहेर गर्दी करतात. किंग खानची एक झलक पाहण्यासाठी चाहते तासनतास प्रतीक्षा करतात. यावर्षीही चाहत्यांनी गर्दी केली. मात्र ही गर्दी तिथून पोलिसांनी हटवली.

वांद्रे झोनचे पोलीस उपायुक्त आज सकाळी मन्नतबाहेर तैनात होते. त्यांनी मीडिया कर्मचारी आणि चाहत्यांना शाहरूखच्या घराबाहेर असण्याऱ्या काळ्या गेटवर गर्दी करण्यापासून रोखलं. पोलिसांनी सांगितलं की, शाहरूखने मॅनेजर पूजा ददलानीद्वारे माहिती दिली आहे की, तो त्याच्या कुटुंबीयांसह अलिबागच्या फार्महाऊसवर वाढदिवस साजरा करणार आहे.

shah rukh aaryan khan
शाहरुखच्या 'मन्नत' बंगल्याची आताची किंमत वाचून तुमचे डोळे विस्फारतील!

क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी जामीन मिळाल्यानंतरही आर्यनला दर शुक्रवारी एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी लागणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने १४ अटींवर आर्यनला जामीन मंजूर केला. या अटींनुसार, त्याला देश सोडून जाता येणार नाही. २० दिवसांहून अधिक काळ कारागृहात राहिलेल्या आर्यनला २८ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com