हॉट अभिनेत्री पूनम पांडे अडकली विवाहबंधनात, फोटो व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 11 September 2020

पूनम पांडेने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्न केलं आहे. पूनमने सोशल मिडियावर तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मुंबई- सोशल मिडियावर आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असणा-या अभिनेत्री पूनम पांडेने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेसोबत लग्न केलं आहे. पूनमने सोशल मिडियावर तिच्या लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या बातमीमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. दोघांचे लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सोशल मिडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

हे ही वाचा: बापरे! ए.आर.रेहमानवर एवढ्या कोटी रुपयांचा टॅक्स चुकवल्याचा लागला आरोप, वाचा काय आहे प्रकरण    

पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांनी त्यांच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. सध्या सोशल मिडियावर पूनम पांडेच्या लग्नाचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. या फोटोंना काही तासांतच लाखो लाईक्स मिळाले आहेत. पूनम तिच्या लग्नाच्या फोटोमध्ये नेव्ही ब्लु रंगाच्या लेहेंग्यामध्ये दिसतेय. तर सॅम बॉम्बे देखील ब्लु रंगाच्या शेरवानीमध्ये दिसून येत आहे. दोघं अनेक महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on

पूनम पांडेने फोटो शेअर करत म्हटलं आहे की, 'पुढचे सात जन्म मला तुझ्यासोबत घालवायचे आहेत.' ज्यावर सॅमने कमेंट करत म्हटलं आहे, 'होय मिसेस बॉम्बे.' पूनम आणि बॉम्बे इंस्टाग्रामवर केवळ एकमेकांनाच फॉलो करतात. अभिनेत्री पूनम पांडे हिने २०१३ साली 'नशा' सिनेमापासून तिच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती.

Poonam Pandey Ties The Knot With Fiance Sam Bombay, Gives Major Wedding  Goals In Coordinated Outfits

पूनम नेहमीच इंस्टाग्रामवर येऊन चाहत्यांच्या प्रश्नांना उत्तर देत असते. पूनम पांडेचे इंस्टाग्रामवर ३ मिलियन फॉलोअर्स आहेत. तिचे चाहते तिचे फोटो आणि व्हिडिओची आतुरतेने वाट पाहत असतात. पूनमने अनेकदा सॅमसोबत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.   

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Here’s looking forward to seven lifetimes with you.

A post shared by Poonam Pandey (@ipoonampandey) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: poonam pandey gets married to boyfriend sam bombay photo video