लग्न मोडल्यानंतर पूनम पांडेनं घेतला महत्त्वाचा निर्णय | Poonam Pandey | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poonam Pandey

लग्न मोडल्यानंतर पूनम पांडेनं घेतला महत्त्वाचा निर्णय

अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये तिने पती सॅम बॉम्बेविरोधात (Sam Bombay) मारहाणीची तक्रार दाखल केली होती. पतीने केलेल्या जबर मारहाणीनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पूनम तिच्या खासगी आयुष्याविषयी, ट्रोलिंग आणि कास्टिंग काऊचविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. या मुलाखतीत तिने काही धक्कादायक खुलासेसुद्धा केले आहेत. वैवाहिक आयुष्यात आलेल्या धक्कादायक अनुभवानंतर किमान पाच वर्षे तरी कोणाला डेट करण्याच्या मनस्थितीत नाही, असं तिने स्पष्ट केलं.

'स्पॉटबॉय ई'ला दिलेल्या मुलाखतीत ती म्हणाली, 'सध्या मी मानसोपचार तज्ज्ञांकडे उपचार घेत आहे. त्यामुळे मला सॅमविषयी फार काही बोलायचं नाहीये. किमान पाच वर्षे तरी मी कोणाला डेट करणार नाही. सध्या मी डेटिंगचा कोणताच विचार करू शकत नाही. मानसिकदृष्ट्या मी खूप खचले आहे.'

'ट्रोलिंगचा विचार मी आधी खूप करायचे. पण आता मला त्याने काही फरक पडत नाही. मी माझा वेळ आनंदात घालवते. तुम्ही काही चांगलं केलंत तरी ट्रोल व्हाल आणि वाईट केलंत तरी ट्रोलिंग होणारच. त्यामुळे ट्रोलिंगला फार महत्त्व न देणंच योग्य आहे. उलट मी म्हणेन की ट्रोलर्स तुमचा विचार करून ते तुम्हाला अधिक महत्त्व देत आहेत. त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्या', असं मत पूनमने मांडलं.

हेही वाचा: 'पुष्पा'ची क्रेझ रवींद्र जडेजालाही; अल्लू अर्जुनच्या कमेंटने वेधलं लक्ष

इंडस्ट्रीतील कास्टिंग काऊचबद्दल बोलताना ती पुढे म्हणाली, 'मी कधी कास्टिंग काऊचचा सामना केला का, असा प्रश्न मला अनेकजण विचारतात. पण सुदैवाने मला असा अनुभव आला नाही. या इंडस्ट्रीमध्ये माझा कोणीच गॉडफादर नव्हता किंवा बॉलिवूडमध्ये माझे कोणते मित्रही नाहीत. स्वत:च्या हिंमतीवर मी सगळं कमावलं आहे.'

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top