Post Office Ughad Aahe: 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप.. या दिवशी.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Post Office Ughad Aahe marathi serial on sony marathi closed windup soon

Post Office Ughad Aahe: 'पोस्ट ऑफिस उघडं आहे' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप.. या दिवशी..

Post Office Ughad Aahe: सोनी मराठी वरील 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमानंतर महाराष्ट्राचे भरभरून मनोरंजन करणारी आणखी एक मालिका आली ती म्हणजे, 'पोस्ट ऑफिस उघडं आहे'. एका वेगळा विषय आणि आशय घेऊन ही मालिका आणि प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली.

पोस्टाचं जेव्हा संगणकीकरण झालं तेव्हा नेमकं काय झालं, किती अडचणी आल्या याचा भन्नाट प्रहसन या मालिकेतून करण्यात आलं. विशेष म्हणजे हास्यजत्रेतील सर्व इरसाल नमुने या मालिकेत असल्याने हा कार्यक्रम अधिकच लोकप्रिय झाला.

पण प्रेक्षकांना नाराज करणारी एक बातमी आता समोर आली आहे. हा कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

(Post Office Ughad Aahe marathi serial on sony marathi closed windup soon)

नव्वदच्या दशकातला पोस्ट ऑफीसचा काळ या मालिकेत दाखवण्यात आला होता. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. पण आता तीन महिन्यांतच ही मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीने घेतला आहे. या मालिकेचा शेवटचा भाग येत्या उद्या 2 एप्रिल रोजी प्रसारित होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या मालिकेमध्ये समीर चौघुले, दत्तू मोरे, वनिता खरात, शिवाली परब, प्रभाकर मोरे, ईशा डे, पृथ्वीक प्रताप, आशुतोष वाडेकर यांबरोबरच ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी आपले भरभरून मनोरंजन केले. आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याने चाहते चांगलेच नाराज झाले आहेत. 

या मालिकेत दाखवण्यात आले आहे की, पोस्टात संगणक आल्याने सर्वांची त्रेधा उडाली आहे. त्यात पोस्ट मास्तर कोण होणार यासाठीही स्पर्धा पाहायला मिळाली. आता अंतिम भागातही आपल्याला पोस्ट मास्तर पदासाठी शर्यत पाहायला मिळणार आहे. गुळसकर आणि निरगुडकर यांच्यात परगावचं पोस्ट मास्तर कोण होणार यावरून चुरस रंगणार आहे. त्यामुलए पारगाव पोस्टाची अंतिम परीक्षा कशी असेल, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे. पण या मालिकेने लवकर निरोप घेतल्याने प्रेक्षक मात्र नाराज आहे.