उभ्या आयुष्यात सनी पाजीने असा वेग पाहिला नव्हता

टीम ई सकाळ
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

सनी देओल हा नायक नंबर वनच्या स्पर्धेत कघीच नव्हता. तो यायचा आपला सिनेमा घेऊन आणि त्याचा ठरलेला प्रेक्षक तो सिनेमा पाहायचा. आपल्या चाहत्यांवर आणि त्यांचं आपल्या नायकावर कमालीचं प्रेम आहे. यमला पगला दिवाना हा चित्रपट भले फार चालला नाही. त्याचा दुसरा भाग तर त्याहून नाही चालला, पण तरी या सिनेमाचा तिसरा भाग येतोय. कारण एकट्या पंजाबमध्ये या सिनेमाने 100 कोटिंची कमाई केली होती.

मुंबई : सनी देओल हा नायक नंबर वनच्या स्पर्धेत कघीच नव्हता. तो यायचा आपला सिनेमा घेऊन आणि त्याचा ठरलेला प्रेक्षक तो सिनेमा पाहायचा. आपल्या चाहत्यांवर आणि त्यांचं आपल्या नायकावर कमालीचं प्रेम आहे. यमला पगला दिवाना हा चित्रपट भले फार चालला नाही. त्याचा दुसरा भाग तर त्याहून नाही चालला, पण तरी या सिनेमाचा तिसरा भाग येतोय. कारण एकट्या पंजाबमध्ये या सिनेमाने 100 कोटिंची कमाई केली होती. जवळपास 30 वर्षांहून अधिक काळ ईंडस्ट्रीत घालवलेल्या सनीपाजीच्या आयुष्यात एक चकित करणारी गोष्ट घडली, ती अशी की सध्या प्रमोशन सुरू असलेला पोस्टर बाॅईज हा चित्रपट त्यांनी केवळ 37 दिवसांत शूट केला. आजवरच्या आयुष्यात इतक्या वेगात शूट झालेला सनीपाजीचा पहिला सिनेमा होता हा. 

पोस्टर बाॅईज या मराठीत येऊन गेलेला चित्रपट आता हिंदीत येतोय. याचं दिग्दर्शन करतो आहे श्रेयस तळपदे. सिनेमाचं शूट पूर्ण झालं आहे. सनी देओल, बाॅबी देओल आणि श्रेयस अशी झकास कास्ट असणार आहे या सिनेमात. याबाबत सेटवरून कळलेली माहिती अशी, की हा सिनेमा याच वेळेत पूर्ण होईल याची खात्री श्रेयसला होती. उलट ठरलेल्या दिवसांपेक्षा चार दिवस आधीच याचं शूट संपलं. 

श्रेयसने यापूर्वी कधीच देओल यांच्यासोबत काम केलं नव्हतं. ठरलेल्या वेळेनुसार शूट चार दिवस आधीच संपलं. शुटच्या शेवटच्या दिवशी कलाकारांना आजचा शूटचा शेवटचा दिवस असल्याचं कळलं. त्यावेळी भोरला हे शूट सुरू होतं. 

 

Web Title: poster boys shoot in 37 days esakal news