श्रेयस तळपदे दिग्दर्शित पोस्टरबाॅईज या चित्रपटाचे झाले पोस्टर लाॅंच

टीम ई सकाळ
सोमवार, 24 जुलै 2017

काही वर्षांपूर्वी मराठीत आलेल्या पोस्टर बाॅईज या चित्रपटावर आता हिंदीत सिनेमा बनत असून त्याचे नावही पोस्टरबाॅईज असेच ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाॅंच सोमवारी झाला. यावेळी सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती. 

मुंबई : काही वर्षांपूर्वी मराठीत आलेल्या पोस्टर बाॅईज या चित्रपटावर आता हिंदीत सिनेमा बनत असून त्याचे नावही पोस्टरबाॅईज असेच ठेवण्यात आले आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक लाॅंच सोमवारी झाला. यावेळी सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती. 

सनी देओल, बाॅबी देओल, श्रेयस तळपदे, सोनाली कुलकर्णी यांच्या या सिनेमात मुख्य भूमिका आहेत. काही वर्षांपूर्वी समीर पाटील दिग्दर्शित हा चित्रपट मराठीत आला होता. त्यात दिलीप प्रभावळकर, ह्रषिकेश जोशी, अनिकेत विश्वासराव, नेहा जोशी, पूजा सावंत असी टीम होती. आता हिंदीत हा सिनेमा बनत असून श्रेयस तळपदे तो दिग्दर्शित करत आहे. मराठीत बनलेल्या चित्रपटातही श्रेयसची छोटी भूमिका होती. 

Web Title: poster Boyz hindi movie poster launch esakal news