'परमाणू'चा फर्स्ट लूक झाला लाॅंच

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून 'परमाणू.. द स्टोरी आॅफ पोखरण' हा चित्रपट सतत चर्चेत आहे. कोणी कल्पनाही करू शकणार नाही अशा पोखरण येथील अणू चाचणीवर हा सिनेमा बेतला असून, दिग्दर्शक अभिषेक शर्मा यांचा हा एक महत्वाकांक्षी चित्रपट मानला जातो. या चित्रपटाचा फर्स्ट लूक आज लाॅंच करण्यात आला. विशेष बाब अशी की अभिनेता जाॅन अब्राहमही या चित्रपटाचा निर्माता आहे. 

या चित्रपटात जाॅन अब्रामह, डायना पेंडी, बमन इराणी यांच्या मुख्य भूमिका आहेत. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना पोखरणची ही अणूचाचणी झाली होती. त्यावेळी जय जवान जय विज्ञान अशी घोषणाही देण्यात आली होती. भारतीय सेना आणि शास्त्रज्ञांनी मिळून ही मोहिम यशस्वी केली होती. सत्य घटनांवर आधारित अशी या चित्रपटाची कथा असून यातील व्यक्तिरेखा मात्र काल्पनिक घेण्यात आल्या आहेत. याबद्दल बोलताना जाॅन म्हणाला, पोखरणची अणूचाचणी भारतासाठी अत्यंत आवश्यक होती. आंतरराष्ट्रीय दबाव झुगारून भारताने ही चाचणी करून अण्वस्त्रांच्या यादीत भारताने आपले स्थान मिळवले. मला खात्री आहे की हा चित्रपट पाहून प्रत्येक भारतीयाला भारताबद्दल, सैन्याबद्दल आणि शास्त्रज्ञांबद्दल अभिमान वाटेल.'

सध्या या चित्रपटाचं पोस्ट प्राॅडक्शन चालू असून या वर्षाखेरीस किंवा नव्या वर्षात हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

Web Title: Poster launch of hindi movie pokharan esakal news