‘लेथ जोशी’चं पोस्टर लाँच

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 जून 2018

‘लेथ जोशी’ या मराठी सिनेमाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आलं. बदलत्या काळात वाढत्या आधुनिकीकरण आणि यांत्रिकीकरणामुळे कामगारांना अनेक जुन्या यंत्रांचा विसर पडत चालला आहे. अशा परिस्थितीत ‘लेथ’ या यंत्राद्वारे प्रेक्षकांना जुन्या यंत्रांची आठवण या चित्रपटातून करून देण्याचा चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा प्रयत्न आहे. यंत्र आणि माणूस यांच्यामधील अनोख्या नात्यावर भाष्य करणारा हा चित्रपट असेल.

मंगेश जोशी दिग्दर्शित या चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्‍विनी गिरी, सेवा चौहान आणि ओम भूतकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. माणूस आणि यंत्र यांची सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांचं मन जिंकणार एवढं नक्की.

Web Title: poster launched of leth joshi movie