
Adipurush Release: प्रभासच्या 'आदिपुरुष'ला घाबरले अजय अन् कार्तिक! सोडणार मैदान..
Movies Release In June: गेल्या काही दिवसांपासुन शाहरुखचा पठाण आणि द केरळ स्टोरी सोडला तर इतर कोणत्याही चित्रपटाने बॉक्स आफिसवर चांगली कमाई केलेली नाही. त्यातच आता प्रभास स्टारर आदिपुरुष या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.
त्यातच काल या चित्रपटचा नवीन ६ जूनला तिरुपतीला प्रभास आणि आदिपुरुषच्या टीमच्या उपस्थितीत भव्य दिव्य फायनल ट्रेलर लाँच झाला चित्रपटाच्या कथेपासून ते चित्रपटातील व्यक्तिरेखेपर्यंत चित्रपटातील अनेक अपडेट जाणुन घेण्यासाठी प्रेक्षक उत्सूक आहेत.
ओम राऊतच्या या चित्रपटाची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. प्रभासचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो याचा निर्मात्यासह चाहत्यांनाही विश्वास आहे. त्यामुळे आता आदिपुरुषसोबत रिलीज करण्यात येणाऱ्या जवळपास बऱ्याच चित्रपटांच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आली आहे.
आदिपुरुष हा चित्रपट 16 जून रोजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर रिलिज होण्यासाठी सज्ज आहे. प्रभासच्या आदिपुरुषची वाढती क्रेझ पाहता चित्रपट रिलीज होण्याआधीच या चित्रपटाचा बिग स्टार अजय देवगण आणि कार्तिक आर्यन यांच्या चित्रपटांवर याचा परिणाम होऊ शकतो असे निर्मात्यांना वाटत आहे.
(Adipurush Maidan Satyaprem Ki Katha Release Date)
आदिपुरुषाचे आपल्या चित्रपटाच्या कमाईला काही फटका बसू नये यासाठीनिर्मात्यांनी कोणत्याही मोठ्या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर टाकले आहे.
त्यातच आता अजय देवगणच्या चर्चित 'मैदान' या चित्रपटाची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.
आधी मैदान हा चित्रपट २३ जूनला प्रदर्शित होणार होता, मात्र आता पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. त्याची तारीख वाढवण्यात आली आहे.
तर कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी यांच्या 'सत्यप्रेम की कथा' या चित्रपटाच्या कमाईला देखील आदिपुरुष चा फटका बसले अशी चिंता निर्मात्यांना वाटत असावी.
त्यामुळे आता 29 जून रोजी प्रदर्शित होणारा 'सत्यप्रेम की कथा' ची रिलिज डेटही निर्माते पुढे ढकलू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तर प्रभासच्या आदिपुरुषबद्दल बोलायचं झाल तर हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये हा चित्रपट रिलिज होणार आहे.
आदिपुरुष मधील प्रभु रामच्या भूमिकेत प्रभास, माता सीतेच्या भूमिकेतील क्रिती अन् लक्ष्मणच्या भूमिकेत सनी सिंग तर लंकेशपती रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान दिसत आहे.