साकार झाला ‘प्रभो शिवाजी राजा’ ऍनिमेशनपट

वृत्तसंस्था
सोमवार, 8 जानेवारी 2018

गणराज असोसिएट्स प्रस्तूत आणि इन्फिनिटी व्हिज्युअल तसेच मीफॅक निर्मित 'प्रभो शिवाजी राजा’ हा शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची गाथा सांगणारा  ऍनिमेशनपट शिवप्रेमींसमोर येत आहे. आतापर्यंत रामायण, महाभारत तसेच हनुमानसारख्या हिंदू दैवतावर  ऍनिमेशनपट आले आहेत, मात्र शिवरायांचे चरित्र मांडणारा ‘प्रभो शिवाजी राजा’ हा पहिला ऍनिमेशनपट लवकरच भेटीला येणार आहे. ऍनिमेशनच्या या युगात प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे, या सिनेमातील काही दृश्य हे खऱ्या खुऱ्या स्थळावरून घेण्यात आली आहेत. ऍनिमेशन म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर, वास्तविकतेची झालर यातून आपणास अनुभवता येणार आहे.

शिवाजी महाराजांचे धाडस, स्वराज्यावरील निष्ठा व स्वराज्य मिळवण्यासाठी घेतलेली मेहनत ही आपणास सर्वांनाच माहित आहे. परंतू, हा सगळा अनुभव या चित्रपटाच्या माध्यमातून पोचविण्याची सर्जनशीलता दिग्दर्शक निलेश मुळे यांनी लीलया पेलली. 

या चित्रपटात दाखवण्यात आलेले सप्तश्रुंगी मातेचे मंदिर, पुरंदर किल्ला, जगदीश्वर फोर्ट, महादरवाजा, नगारखाना, तोरणा फोर्ट, मार्कंडेय इ. दृश्यांना तत्कालीन वास्तविक छायाचित्रांचा संदर्भ जोडण्यात आला आहे. त्यासाठी ऐतिहासिक दस्तावेजातील जुने छायाचित्र गोळा करून, त्या ठिकाणांचा संपूर्ण इतिहास जाणून घेत, आणि त्यावर इतिहासकारांची मत लक्षात घेत ती ऍनिमेशनरुपात  वापरण्यात आली आहेत. तसेच त्या ठिकाणांची रेखाटने ही काढण्यात आली आहेत. फोटोंच्या आधारावर त्या ठिकाणांची ऍनिमेशन प्रतिकृती निर्माण करण्याचे कसब दिग्दर्शकाने दाखविले असून, केवळ लहानमुलांसाठी नव्हे तर महाराजांची महती ऍनिमेशनपटाद्वारे थोरामोठ्यांनादेखील प्रेरणा देऊन जाईल, अशी खास आखणी यात केली आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर व ‘कणखर बांधा’ हे गाणे सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित झाले असून ते प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. "‘प्रभो शिवाजी राजा’ हा चित्रपट जरी ऍनिमेशनपट असला तरी महाराजांची शौर्यगाथा ही प्रत्येकापर्यंत पोहोचावी हा प्रामाणिक हेतू आमच्या सर्व टीमचा आहे," असे दिग्दर्शक निलेश मुळे सांगतात. 

Web Title: Prabho Shivaji Raja