प्रभूदेवा नकारात्मक भूमिकेत 

वृत्तसंस्था
सोमवार, 20 मार्च 2017

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभूदेवाच्या चाहत्यांना खुशखबर आहे. प्रभूदेवाच्या "कोलाइयुथीर कालम' या तमीळ चित्रपटाचा हिंदी रिमेक लवकरच येत आहे. या चित्रपटात तो नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. प्रभूदेवा याबाबत खूपच उत्सुक आहे. यामध्ये त्याच्यासोबत भूमिका चावला व तमन्ना भाटिया मुख्य भूमिकेत आहेत. दिग्दर्शक चक्री तोलेटी यांचा हा हिंदीत रिमेक होणारा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे निर्माते वासू भगनानीने सांगितले की, "21 वर्षांनंतर आम्ही कोणत्यातरी तमीळ चित्रपटाच्या रिमेकवर काम करत आहोत. विनोदी चित्रपटानंतर गंभीर चित्रपट बनवत आहे. याचे चित्रीकरण लंडनमध्ये होणार आहे.'  

Web Title: Prabhu Deva as a Villain