Prajakta Mali फक्त 'प्राजक्तराज' या ज्वेलरी ब्रॅन्डचीच नाही तर पुण्यातील 'या' बिझनेसची देखील आहे मालकीण Prajakta Mali business Woman | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Mali

Prajakta Mali फक्त 'प्राजक्तराज' या ज्वेलरी ब्रॅन्डचीच नाही तर पुण्यातील 'या' बिझनेसची देखील आहे मालकीण

Prajakta Mali हे नाव आज मराठी सिनेइंडस्ट्रीतच नाही तर सोशल मीडियावरचं देखील चर्चेतलं नाव आहे. मराठी मालिका विश्वातून प्राजक्तानं अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. तिच्या 'जुळून येती रेशीमगाठी' या पहिल्याच मालिकेनं तिला भरभरून यश मिळवून दिलं.

पुढे तिनं काही सिनेमे केले पण तिच्या 'रानबाझार' या वेबसीरिमधील तिच्या अभिनयाला खरी दाद मिळाली. आज प्राजक्ता सोशल मीडियावरही अधिक फॉलोअर्स असलेल्या अभिनेत्रींंमध्ये गणली जाते.

आता तर केवळ अभिनेत्रीच नाही तर बिझनेसवूमन म्हणूनही तिला ओळखलं जातं. (Prajakta Mali Marathi Actress Business Woman Dance class owner)

प्राजक्ता सोशल मीडियावर भलतीच सक्रिय असलेली पहायला मिळते. ती अनेकदा ज्या पोस्ट करते त्या नेहमीच चर्चेत आलेल्या पहायला मिळतात. तिनं नुकताच 'प्राजक्तराज' हा तिचा ज्वेलरी ब्रॅन्ड लॉंच केला.

तिच्या या ब्रॅन्डच्या लॉन्चिंग आधी बिझनेस क्षेत्रात पाऊल ठेवण्याची घोषणा तिनं खास अंदाजात केलेली आपण सगळ्यांनीच पाहिली. पारंपरिक दागिने 'प्राजक्तराज' या तिच्या ब्रॅन्ड अंतर्गत विकले जातात.

आज बऱ्यापैकी या ब्रॅन्डचे दागिने लोक विकत घेताना दिसतात. 'प्राजक्तराज'ची मालकीण म्हणून प्राजक्ता माळीची ओळख समोर येत असताना आता तिच्या पुण्यातील आणखी एका बिझनेसविषयी माहिती समोर आली आहे.

प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर नुकत्याच सुरु झालेल्या 'पटलं तर घ्या' या चॅट शो मध्ये प्राजक्ता माळी गेस्ट म्हणून आली होती. तेव्हा तिला विचारलं गेलं होतं की, 'दुसऱ्या अभिनेत्रींचे यश पाहून तुला काही वाटतं का?'

तेव्हा प्राजक्ता म्हणाली,''मला काही वाटत नाही. माझ्या ते स्वभावात नाही. कारण अभिनयक्षेत्रात यायचं मी काही ठरवलं नव्हतं. मी खरंतर क्लासिकल डान्सर आहे. माझे स्वतःचे पुण्यात क्लासेस आहे..जे आजही मी चालवते''. आणि अशाप्रकारे प्राजक्ताचा हा दुसरा बिझनेस सर्वांसमोर आला.