Prajakta Mali: 'दारू प्यायल्यासारखी वाटतेय', 'त्या' व्हिडिओमुळे प्राजक्ता माळी ट्रोल! नेटकऱ्यांनी घेतली शाळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Mali

Prajakta Mali: 'दारू प्यायल्यासारखी वाटतेय', 'त्या' व्हिडिओमुळे प्राजक्ता माळी ट्रोल! नेटकऱ्यांनी घेतली शाळा

मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीची ही सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये गणना केली जाते. तिचा चाहता वर्ग तगडा आहे. प्राजक्ता जितकी अभिनयात उत्तम आहे तितकिच ती उत्तम नृत्यांगणाही आहे. ती तिच्या फिटनेसकडेही लक्ष देते.

ती सोशल मिडियावर खुप सक्रिय असते. नेहमी चाहत्याच्या संपर्कात राहण्यासाठी ती नेहमीच काही ना काही पोस्ट करत असते. नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते.

फिटनेस फ्रिक प्राजक्ता ही नेहमी तिच्या चाहत्यांसोबत तिचे फिटनेस आईडियाज शेअर करत असते. तिने अनेक वेळा योगा करतांनाचेही व्हिडिओ शेअर केलेले आहेत. त्याचप्रमाणे आजही प्राजक्ताने व्हिडिओ पोस्ट केला. ज्यात तिनं अष्टांग योगा कसा करायचा हे दाखवलं आहे.

मात्र प्राजक्ता आता या व्हिडिओवरुन भलतील ट्रोल होत आहे. तिचा हा व्हिडिओ आता पर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिला असून तिला कमेंट करत ट्रोल केलं आहे.

तिला कमेंट करत नेटकऱ्यांनी लिहिलयं की, मराठी बोला असं सर्वांना सांगता आणि आता ,तर दुसऱ्याने लिहिलयं की, 'बिना मेकअप ची दारू पिल्या सारखी वाटते.', '11 वाजता कोण योगा करत प्राजक्ता' , '१० वाजता कोणता योगा असतो सूर्य डोकयावर आला'. असं म्हणतं प्राजक्ताला ट्रोल केलयं.

तर काहींनी तिला प्रोत्साहनही दिलं आहे. 'खुप छान', 'तु नेहमीच नवीन काही तरी शिकवते', असं म्हणतं तिचं कौतुक केलयं.