Marathi Bhasha Gaurav Din: जे आज आहे ते उद्या... Prajakta Mali ची मराठी भाषा दिनाची पोस्ट प्रचंड चर्चेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 prajakta mali, marathi bhasha gaurav din

Marathi Bhasha Gaurav Din: जे आज आहे ते उद्या... Prajakta Mali ची मराठी भाषा दिनाची पोस्ट प्रचंड चर्चेत

Prajakta Mali News: आज २७ फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन. आज सगळीकडे मराठी भाषा गौरव दिना (Marathi Bhasha Gaurav Din) निमित्ताने ठिकठिकाणी उत्सव सुरु आहे.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सुद्धा विविध सण - उत्सवांबद्दल तिच्या खास अंदाजात पोस्ट शेयर करत असते. आज मराठी भाषा दिनानिमित्ताने प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर कायम विविध पोस्ट्सच्या माध्यमातून चर्चेत असते.

(prajakta mali post on marathi bhasha gaurav din)

प्राजक्ता माळीने अस्सल पारंपरिक साडीतले फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोत प्राजक्ताने तिच्या प्राजक्तराज कलेक्शन मधले खास दागिने परिधान केले आहेत.

प्राजक्ता शुभेच्छा देताना लिहिते.. प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं..प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं…प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं..मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं…कवीश्रेष्ठ कुसूमाग्रजांनी लिहीलेल्या ह्या ओळींसारखंच प्रेम आहे माझं..

प्राजक्ता पुढे लिहिते.. माझ्या “मराठीवर”…जे आहे आज, राहील उद्या , परवा..मरणोत्तरही….. .“मराठी भाषा गौरव दिनाच्या”; महाराष्ट्राला आभाळभर शुभेच्छा…

अशा खास अंदाजात प्राजक्ताने मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. प्राजक्ताच्या पोस्ट्स वर सर्वांनी पसंती दर्शवली असून तिच्या अस्सल पारंपरीक फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सध्या 'पटलं तर घ्या' या चॅट शोमुळे चर्चेत आहे. प्लॅनेट मराठी वरील या चॅट शो मध्ये प्राजक्ता माळीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील अनेक गोष्टींवर खुलासा केलाय.

या चॅट शोमध्ये प्राजक्ता सोबत अभिनेत्री ऋतुजा बागवे सहभागी होती. यावेळी बोलता बोलता प्राजक्ताने तिच्या मराठी इंडस्ट्रीतल्या क्रश बद्दल खुलासा केलाय.

अभिनेता वैभव तत्ववादी प्राजक्ताचा एकेकाळी क्रश होता. याशिवाय हाच माळी कुटुंबाचा जावई होईल असं प्राजक्ता तिच्या आईला म्हणाली होती.

प्राजक्ता सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं निवेदन करत आहे. याशिवाय काहीच महिन्यांपूर्वी मनसे प्रमुख राज ठाकरें (Raj Thackeray) च्या उपस्थितीत प्राजक्ताने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रँड सुरु केला.

प्राजक्ताची रानबाजार सिनेमातली बोल्ड भूमिका आणि पांडू सिनेमातली खलनायकी भूमिका प्रचंड गाजली.