राज ठाकरेंच्या भाषणावर प्राजक्ता माळी फिदा; म्हणाली...

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची तारका प्राजक्ता माळीने राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे.
Prajakta Mali comment on Raj Thackery Speech
Prajakta Mali comment on Raj Thackery SpeechSakal

काल गुढी पाडव्याच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गुढीपाडवा मेळाव्याचं आयोजन केलं होते. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी आपल्या खास शैलीत उपस्थितांना संबोधित केले. शिवाजी पार्कवरील राज ठाकरेंच्या भाषणानंतर विविध राजकीय पक्षांतील नेत्यांनी टीका केली. परंतु मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची तारका प्राजक्ता माळीने राज ठाकरेंचं कौतुक केलं आहे. फक्त कौतुक करून ती थांबली नाही तर राज ठाकरेंच्या भाषणाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर देखील केला आहे. (Prajakta Mali Reaction on MNS Raj Thackrey Speech at Shivaji Park)

Prajakta Mali comment on Raj Thackery Speech
Video: हे सगळे कॅमेरेवाले आले की पक पक सुरु होते- राज ठाकरे

अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) फेसबुकवर राज ठाकरेंच्या भाषणाचे व्हिडीओ शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये ती म्हणाली की, " नाही नाही..मी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयूष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती. ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय. इतकाच हेतू."

दरम्यान प्राजक्ता माळी हिने आपल्या पोस्टमध्ये मनसेमध्ये प्रवेश करणार नसल्याचं म्हटलं असले तरी एकंदरीत तिचं कालच्या सभेला उपस्थित राहणं आणि त्याचा व्हिडीओ शेअर करणं यामुळे ती मनसे प्रवेश करणार का अशा चर्चा समाजमाध्यमांमध्ये रंगू लागल्या आहेत.

Prajakta Mali comment on Raj Thackery Speech
राज ठाकरे सत्यच बोलले, महाविकास आघाडीने... - फडणवीस

राज ठाकरे काय म्हणाले?

दरम्यान राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणात यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांवर त्यांनी तोफ डागली. खासकरून राष्ट्रवादीचे आमदार गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्यांनी जहरी टीका केली. त्यांच्या या भाषणानंतर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com