Prajakta Mali: रडायला खांदा पाहिजे म्हणून प्रेम हवं पण.. प्रेमाविषयी प्राजक्ता जरा स्पष्टच बोलली.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prajakta Mali talks about love and career, she said career is my lifestyle and i believe in love

Prajakta Mali: रडायला खांदा पाहिजे म्हणून प्रेम हवं पण.. प्रेमाविषयी प्राजक्ता जरा स्पष्टच बोलली..

Prajakta Mali: मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. लोकप्रिय अभिनेत्री, डान्सर, निवेदिका प्राजक्ता माळी हिचं प्रचंड फॅन फॉलोइंग आहे. तिचा सिनेमा असो किंवा वैयक्तिक आयुष्यातील काही घडामोडी, ती सतत प्रकाशझोतात असते. नुकतच तिने प्राजक्तराज हा तिचा ज्वेलरी ब्रॅण्डही सुरु केला आहे. ती महाराष्ट्राची क्रश म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

प्राजक्ता आणि प्रेम हे एक वेगळच समीकरण आहे. मध्यंतरीही तिने तिच्या गुरूंना लग्न करावं की नाही याबाबत विचारलं होतं. तेव्हाही ती चर्चेत आली होती. आता मात्र तिने थेट प्रेमावर भाष्य केले आहे. यावेळी तिने काहीसा तिखट सूर लावला. पाहूया नेमकं काय म्हणाली प्राजक्ता..

(Prajakta Mali talks about love and career, she said career is my lifestyle and i believe in love )

नुकत्याच झालेल्या झी युवा सन्मानमध्ये प्राजक्ताला 'झी युवा तेजस्वी चेहरा' म्ह्णून गौरवण्यात आले. त्यादरम्यान दिलेल्या एका मुलाखतीत प्राजक्ताला प्रेम की करियर असे विचारण्यात आले, त्यावर ती म्हणाली.. 'प्रेम ही आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. सगळ्यात शक्तिशाली गोष्ट आहे. मोठ्यातला मोठा डोंगरही हलवू शकतो प्रेमाने.'

' पण आता आपण अवतीभवती प्रेम बघतो ते फार उथळ वाटतं मला. तडजोड केलेलं वाटतं कधी पैशांसाठी, कधी भविष्याचा विचार करून, इमोशनल, रडायला खांदा पाहिजे, समाजाला दाखवायला काहीतरी पाहिजे म्हणून लोकांना प्रेम हवंय.. हल्ली प्रेम या पातळीपर्यंत झुकतंय की काय असं कधीतरी वाटतं.'

'पण मला माहितीये की खरं प्रेम आजही आहे. त्यामुळे करियर आणि प्रेम यामध्ये निवड करणं अवघड आहे. कारण मी जे करतेय ते फक्त करिअर नाहीये माझ्यासाठी. ती माझी जीवन पद्धती आहे.' असं प्राजक्ता म्हणाली.

प्राजक्ता पुढे म्हणाली, ' कलाक्षेत्रात काम करणं आणि समाजभान बाळगून काहीतरी करणं हे वायरिंग माझ्यात वरूनच आलंय, त्याचं मी काही करू शकत नाही. मी एवढे एवढे पैसे कमावेन आणि घरी बसेन असं कधीच नाही होणार. किंवा एवढ्या फिल्म केल्या आणि झालं आता असं कधीच नाही होणार. त्यामुळे करिअरची व्याख्या पण माझी वेगळी आहे. सतत काहीतरी करत राहणं ही माझी गरज आहे त्यामुळे नक्कीच मी करिअर निवडेन.' प्राजक्ताचे हे विचार सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.

टॅग्स :prajakta mali