Prasad Oak: प्रसाद ओकने केली मोठी घोषणा, साकारणार.. तोच मी.. प्रभाकर पणशीकर.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sakal

Prasad Oak: प्रसाद ओकने केली मोठी घोषणा, साकारणार.. तोच मी.. प्रभाकर पणशीकर..

prasad oak:अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या भलताच चर्चेत आहेत. 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली. त्याचा 'धर्मवीर'चा सर्व प्रवास आता 'माझा आनंद' या पुस्तकातूनही समोर आला आहे. लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे. अशा प्रकाशझोतात असतानाच प्रसादने नुकतीच एक मोठी घोषणा केली आहे. प्रसादचा नवा बायोपिक येत आहे. एक पोस्ट शेयर करत त्याने ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. (prasad shared big announcement he play lead role in toch mi prabhakar panshikar new marathi biopic movie)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: शेवटचं एलिमिनेशन अन् प्रसाद जवादे घराबाहेर..

अभिनेता प्रसाद ओक याने आजवर शंभरहून अधिक चित्रपट केले. पण अभिनेता म्हणून त्याला खरी ओळख मिळाली ती 'धर्मवीर' या चित्रपटातून. त्याने आजवर अनेक चित्रपटात प्रमुख भूमिकाही केल्या आहेत, पण 'धर्मवीर' हा त्याचा पहिला बायोपिक.. ज्यामध्ये त्याने शिवसेना नेते आनंद दिघे यांची भूमिका साकारली होती. या भूमिकेची प्रचंड वाहवा झाली. आता पुन्हा एकदा प्रसाद एका नव्या बायोपिक मध्ये झळकणार आहे.

लेखक दिग्दर्शक अभिजीत देशपांडे हा बायोपिक करणार आहे. ज्येष्ठ रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या जीवनावर हा चित्रपट असून 'तोच मी.. प्रभाकर पणशीकर' असे या चित्रपटाचे नाव आहे. नुकताच अभिजीतचा 'हर हर महादेव' हा चित्रपट येऊन गेला. तर या आधीही त्याने अनेक दर्जेदार चित्रपट केले आहे. अभिनेते डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा 'आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर' हा बायोपिक देखील अभिजीतनेच साकारला होता. त्यानंतर अभिजीतची ही मोठी घोषणा आहे. विशेष म्हणजे प्रभाकर पणशीकर यांच्या भूमिकेत प्रसाद ओकला पाहायला सारेच उत्सुक आहेत.

प्रसादने या चित्रपटाचे पहिले पोस्ट शेयर करत लिहिले आहे की, ' नवं वर्ष… नवं स्वप्न…
सोबत जुनेच मित्र कलावंत… आणि… आशीर्वाद देणारे आहेत "पंत"..' प्रसादच्या या घोषणेमुळे त्याच्या चाहत्यांना मोठा आनंद झाला आहे.

टॅग्स :prasad oak