Viral Video : 'पण प्रसाद तू कुत्र्याशी इंग्लिशमध्ये का बोलतोय?'

मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक हा नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो.
Viral Video
Viral Video esakal

Prasad Oak Viral Video : मराठी चित्रपट विश्वातील प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता प्रसाद ओक हा नेहमीच वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो. आता तो त्याच्या एका भन्नाट व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. त्यावरुन त्याला त्याच्या चाहत्यांनी दिलेल्या प्रतिक्रियाही मोठ्या गंमतीशीर असल्याचे दिसून आले आहे.

प्रसादच्या त्या व्हायरल व्हिडिओनं त्याचे चाहते, नेटकरी अवाक् झाले आहेत. त्यांना प्रसाद नेमकं काय करतो आहे असा प्रश्न पडला आहे. प्रसाद हा त्याच्या मस्करा नावाच्या कुत्र्याशी बोलतो आहे. त्यावर प्रसादची पत्नी मंजिरी ओक यांनी लिहिलं आहे की, , “प्रसाद ते सगळे ठीकेय..पण तू इंग्लिश का झाडतोयस ?” प्रसादनं देखील माझचं इंग्रजी त्या प्राण्याला कळत असल्याचे म्हटले आहे.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

प्रसादचा तो व्हिडिओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी त्यावर दिलेल्या प्रतिक्रिया भलत्याच भन्नाट आहे. काहींनी प्रसादची फिरकी घेतली आहे. प्रसाद दादांना जास्त झाली आहे,त्यांनी थोडी जरा जास्तच घेतली आहे. अशा शब्दांत त्यांना कानपिचक्या दिली आहे. एकानं दादा तुम्ही असं का करत आहात, यातून तुम्हाला नेमकं काय सांगायचे आहे असा प्रश्न विचारला आहे. बाकी कुणी काही का म्हणेना प्रसादच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Viral Video
Salman Khan : सलमान खानचं ८० कोटींचं फार्महाऊस, त्यात तर...

प्रसादच्या त्या पोस्टवर त्याला मराठीतील काही सेलिब्रेटींनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. प्रसादच्या प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास त्याच्या यापूर्वीच्या धर्मवीर, चंद्रमुखी चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. धर्मवीरमध्ये तर त्यानं साकारलेली आनंद दिघेंची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेली आहे. या चित्रपटानं प्रसादला वेगळी ओळख दिली आहे. असं म्हणता येईल.

Viral Video
The Kerala Story row:'केरळ स्टोरीला विरोध करणारे दहशतवादी' वादात कंगना संतापली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com