Prasad Oak: लव्ह यू.. म्हणत लाडक्या मंजूला वाढदिवशी प्रसाद ओकने दिलं खास सरप्राईज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prasad Oak, Prasad Oak birthday, manjiri oak, manjiri oak birthday

Prasad Oak: लव्ह यू.. म्हणत लाडक्या मंजूला वाढदिवशी प्रसाद ओकने दिलं खास सरप्राईज

Prasad Oak wife Manjiri Oak Birthday News: बायको जर पाठीशी खंबीरपणे उभी असेल तर नवरा यशस्वी प्रगती करू शकतो.

मराठी मनोरंजन विश्वात असे अनेक अभिनेते आहेत ज्यांच्या पाठीशी त्यांची पत्नी खंबीरपणे उभी आहे. अशीच एक जोडी म्हणजे प्रसाद ओक आणि मंजिरी ओक.

प्रसादच्या आजवरच्या सर्व चढ - उताराच्या काळात मंजिरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. आज मंजिरीचा वाढदिवस. त्यामुळे प्रसादने तिच्यासाठी खास पोस्ट केलीय.

(prasad oak plan special surprise for his wife manjiri oak birthday)

मंजिरी ओकचा पांढऱ्या गाऊनमधला फोटो प्रसादने शेयर केलाय. या फोटोत प्रसाद ब्लॅक टी शर्ट मध्ये फॉर्मल अंदाजात दिसत आहे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंजू. लव्ह यू अशी पोस्ट लिहून प्रसादने मंजिरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. याशिवाय प्रसादने मंजिरीसाठी खास सरप्राईज प्लॅनचं आयोजन केलं असून दोघे एका हॉटेलमध्ये रोमँटिक अंदाजात दिसत आहेत.

हरहुन्नरी अभिनेता प्रसाद ओक सध्या यशाच्या शिखरावर आहे. चंद्रमुखी आणि धर्मवीर या दमदार चित्रपटानंतर त्यांचे अनेक मोठे प्रोजेक्ट जाहीर केले आहेत.

डॉ. प्रभाकर पणाशीकर यांचा यांच्या बायोपीक मध्ये तो प्रमुख भूमिकेत आहे तर निळू फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तो स्वतः दिग्दर्शित करत आहे. अशातच त्याने एक मोठी घोषणा केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावर आधारित 'परिनिर्वाण' चित्रपट येणार असल्याची बरीच चर्चा होती. अखेर त्याची घोषणा झाली आहे. नुकतेच या चित्रपटाच्या मोशन पोस्टर अनावरण करण्यात आले.

यावेळी अभिनेता प्रसाद ओक देखील उपस्थित होता. तो कोणती भूमिका साकारणार याची सर्वांनाच उत्कंठा होती आणि अखेर ते जाहीर झाले आहे. या चित्रपटात प्रसाद ओक नामदेव व्हटकर यांची भूमिका साकारणार आहे.

टॅग्स :Marathi Moviesprasad oak