Prasad Oak: पुढच्या भागात काय होणार? 'धर्मवीर' ला वर्षपुर्ती होताच प्रसाद ओकची खास पोस्ट, म्हणाला.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prasad Oak shared post about dharmveer marathi movie one year complete and announce part 2

Prasad Oak: पुढच्या भागात काय होणार? 'धर्मवीर' ला वर्षपुर्ती होताच प्रसाद ओकची खास पोस्ट, म्हणाला..

Prasad Oak post about Dharmaveer movie News: गेल्या काही वर्षातील दमदार मराठी चित्रपटांपैकी एक म्हणजे 'धर्मवीर'. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. बॉक्स ऑफिस वर दमदार कमाई केलीच शिवाय अनेक पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.

गेल्या वर्षी 13 मे २०२२ ला आलेला धर्मवीर सिनेमा प्रचंड गाजला. या सिनेमात अभिनेता प्रसाद ओकने धर्मवीर आनंद दिघेंची भूमिका साकारली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनचरित्रावर आधारित धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे हा बहुचर्चित सिनेमा ठरला.

आज या चित्रपटाला एक वर्ष पूर्ण झाला. त्यानिमित्ताने प्रसाद ओकने एक खास पोस्ट शेयर केली ज्यामध्ये दुसऱ्या भागाविषयी एक महत्वाची अपडेट आहे.

(Prasad Oak shared post about dharmveer marathi movie one year complete and announce part 2)

या वेळी प्रसादने ''धर्मवीर''मधील आनंद दिघे यांच्या भूमिकेतील पोस्टर शेयर केला आहे. सोबत एक कॅप्शनही दिले आहे. या पोस्ट मध्ये प्रसाद म्हणाला आहे, "धर्मवीर" माझ्या आयुष्यातल्या
या एका अनोख्या वळणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय...!!''

''या भूमिकेनी, या चित्रपटानी मला जे काही दिलं ते शब्दांपलीकडचं आहे. पुन्हा एकदा प्रविण तरडे, मंगेश देसाई, मंगेश कुलकर्णी, अश्विन पाटील, सचिन नारकर, भट्टे काका, सचिन जोशी, मा. खा. श्रीकांत जी शिंदे आणि मा. मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब आणि धर्मवीर च्या संपूर्ण टीम चे अत्यंत मनःपूर्वक आभार...!!!''

पुढे प्रसाद म्हणतो, ''आणि रसिक प्रेक्षकांचे सुद्धा शतशः आभार...!!! धर्मवीर - भाग 2 ला सुद्धा आपले आशीर्वाद आणि प्रेम भरभरून मिळेल अशी आशा करतो...!!! "दिघे साहेब"... असेच कायम पाठीशी रहा'' अशी पोस्ट प्रसादनं शेयर केली आहे.

'धर्मवीर'चित्रपटाची सांगता होतानाच चित्रपट अर्धवट राहिला की काय अशी चुणूक प्रेक्षकांच्या मनाला लागली आणि काही दिवसातच याचा दुसरा भाग येणार असल्याचे चित्रपट निर्मात्यांनी जाहीर केले. आता प्रेक्षकांना दुसऱ्या भागाची उत्सुकता लागली आहे. अशातच प्रसादने पोस्ट मध्ये दुसऱ्या भागाचा उल्लेख केल्याने प्रेक्षक अधिकच आतुर झाले आहेत.

अनेकांनी कमेंट करत या दुसऱ्या भागात काय असेल?, चित्रीकरण सुरू झालं का?.. , कधी येणार हा चित्रपट.. अशा अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.

टॅग्स :prasad oak