
Prasad Oak: बाबो! व्हिडिओ करत थेट नेटकऱ्यांपुढेच प्रसादने केली बायकोची तक्रार, म्हणाला..
Prasad Oak : अभिनेता आणि दिग्दर्शक प्रसाद ओक सध्या भलताच चर्चेत आहेत. 'चंद्रमुखी' आणि 'धर्मवीर' असे दोन सिनेमे त्याने लागोपाठ दिले. एका चित्रपटाचे त्याने दिग्दर्शन केले तर एका चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली.
लवकरच तो ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर चित्रपट करणार आहे. प्रसाद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. कधी रील्स शेयर करत असतो तर कधी मनातल्या गोष्टी.. आज तर त्याने चक्क एक व्हिडिओ शेयर करत आपल्या बायकोची म्हणजे मंजिरीची तक्रार केली आहे.
(Prasad Oak shared video and said wife manjiri oak always complaint about new clothes )
प्रसाद आणि मंजिरी ओक ही मराठी मनोरंजन विश्वातली एक लोकप्रिय जोडी. मंजिरी आधी घराकडे लक्ष देत होती पण आता ती प्रसादच्याच कामाचा एक भाग झाली आहे. ती प्रसादच्या अनेक प्रोजेक्ट मध्ये खांद्याला खांदा लावून काम करते.
तो आजपर्यंत नेहमीच आपल्या बायकोविषयी व्यक्त झाला आहे. कधी तो तीचं कौतुक करतो तर कधी तिची खिल्ली उडवतो. आज मात्र त्याने एक व्हिडिओ करत तिची तक्रार केली आहे.
यामध्ये प्रसाद म्हणतो, 'आमच्या घरात दोन वाक्य कायम ऐकू येतात... एक.. कपडे ठेवायला जागाच नाहीय यार.. एक नवीन कपाट बनवूया? आणि दुसरं.. बाहेर जायला माझ्याकडे कपडेच नाहीयत यार... आणि ही दोन्ही वाक्यं एकच व्यक्ती बोलते..' असं म्हणत प्रसादने थेट चाहत्यांनाच प्रश्न विचारला आहे की.. ओळखा बरं ही व्यक्ती कोण?''
अर्थातच ही व्यक्ती म्हणजे मंजिरी ओक. प्रसादने ही तक्रार अत्यंत खोडकर आणि मजेशीर पद्धतीने मांडली आहे. त्याच्या या व्हिडिओवर चांगलाच प्रतिसाद मिळत आहे.