प्रशांत दामले-वर्षा उसगांवकर 36 वर्षांनी पुन्हा एकत्र

मराठी नाटय आणि चित्रपट क्षेत्रातील मोठं नाव म्हणून प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांचे नाव घेता येईल.
Prashant Damle and varsha Usgoankar
Prashant Damle and varsha Usgoankar

Marathi Entertainment News: मराठी नाटय आणि चित्रपट क्षेत्रातील मोठं नाव म्हणून प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांचे नाव घेता येईल. त्यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ नाटकांमध्ये दमदार भूमिका करणाऱ्या दामले यांचा चाहता वर्ग मोठा आहे. गेल्या दोन वर्षांपासुन मराठी नाट्यसृष्टीला कोरोनाचा मोठा फटका बसला होता. त्यामुळे नाटक निर्माते, लेखक आणि पडद्यामागील कलाकार यांना मोठ्या आर्थिक समस्येला सामोरं जावं लागलं होतं. आता परिस्थिती पूर्वपदावर आली असताना मराठी प्रेक्षकांना दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठी प्रेक्षक नाट्यगृहांमध्ये गर्दी करताना दिसत आहे.

प्रशांत दामले यांनी आज सोशल मीडियावर (Social Media Post) एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्यांनी आपल्या आगामी नाटकाविषयी सांगितलं आहे. त्यांचं 'सारखं काहीतरी होतंय' नाटक रंगमंचावर येणार आहे. त्याची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. त्याचे कारण म्हणजे तब्बल 36 वर्षानंतर प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगांवकर (varsha Usgoankar) आणि प्रशांत दामले हे एकत्र काम करणार आहे. त्यामुळे त्यांना एवढ्या वर्षानंतर रंगमंचावर पाहणं प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असणार आहे. यापूर्वी त्यांनी सवत माझी लाडकी या चित्रपटामध्ये काम केले होते. तो चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता.

आता पुन्हा ३६ वर्षांनंतर हे दोन्ही दिग्गज कलाकार मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दामले यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेयर करताना लिहिलं आहे की, पुन्हा एकदा मी आणि वर्षा रंगमंचावर! सादर आहे आमचं नवीन नाटक, लवकरच रंगमंचावर. लेखन व दिग्दर्शन - संकर्षण कऱ्हाडे. त्यांच्या या नाटकाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. यापूर्वी दामले यांच्या एका लग्नाची गोष्ट आणि एका लग्नाची गोष्ट या नाटकांना प्रेक्षकांची मोठी दाद मिळाली होती.

Prashant Damle and varsha Usgoankar
Video Viral: पहाटेच्या अंधारात विकी-कतरिनाची लपाछपी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com