प्रविण तरडे यांची नवीन कलाकृती 'सरसेनापती हंबीरराव'

Pravin Tarades new project Sarsenapati Hambirrao
Pravin Tarades new project Sarsenapati Hambirrao

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे सरसेनापती म्हणून आपला दबदबा निर्माण केलेले कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, धगधगता आणि ज्वलंत इतिहास म्हणजे सरसेनापती हंबीरराव मोहिते. स्वराज्याच्या निर्मिती आणि जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान असलेल्या सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे कार्य लवकरच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. पुण्यात शिवजयंतीच्या निमित्त निघालेल्या भव्य मिरवणूक सोहळ्यात लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण तरडे यांनी या चित्रपटाची घोषणा केली.

शिवजयंती महोत्सव समितीतर्फे भव्य शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवनेरी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि हंबीरराव मोहिते यांचे वंशज संदीप मोहिते पाटील, बीव्हीजी ग्रुपचे हनुमंत गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य आणि युवा नेते रोहित पवार, आमदार भीमराव तापकीर, दत्तात्रय धनकवडे, अमित गायकवाड अभिनेता रमेश परदेशी, देवेंद्र गायकवाड, महेश हगवणे, न्यूक्लियस सप्लिमेंटचे श्रीपाद चव्हाण आदी उपस्थित होते.

या चित्रपटाची निर्मिती शिवनेरी फाउंडेशन करत असून संदिप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रविण तरडे यांचे असणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना तरडे म्हणाले, 'हंबीरराव मोहिते यांनी आपल्या चाणाक्ष बुद्धीने स्वराज्याला श्रीमंत केले. हंबीरराव मोहितेंच्या नजरेतून मराठा साम्राज्य या चित्रपटात बघायला मिळेल. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज, नामवंत कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. तर हंबीरराव यांच्या प्रमुख भूमिकेत कोण? याचा उलगडा शिवराज्याभिषेक दिन म्हणजेच 6 जून ला होईल.' हा चित्रपट जानेवारी 2020 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल, असेही तरडे यांनी सांगितले.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
'सकाळ' इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com