
Video: कमाल..! कराडचा योगेश ऑस्ट्रेलियात फरसाण विकून झालाय करोडपती, Pravin Tarde चा व्हिडिओ चर्चेत
Pravin Tarde News: सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक प्रवीण तरडे जगभर फिरून तिथल्या मराठी माणसांचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. प्रवीण तरडेंचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या व्हिडिओत प्रवीण तरडे ऑस्ट्रेलियाला एका मराठी माणसाची फरसाण फॅक्टरी बघायला गेला आहेत.
या मराठी माणसाने ऑस्ट्रेलियात फरसाण विकून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. या मराठी माणसाचं नाव आहे योगेश चव्हाण (Yogesh Chavan). योगेश मूळचे कराडचे आहेत.
(pravin tarde latest video of marathi boy yogesh chavan from karad successful business in australia)
प्रवीण तरडे बायको स्नेहल सोबत ऑस्ट्रेलियाला गेले होते. तेव्हा त्यांनी कराडच्या मराठी मातीतल्या योगेश चव्हाण यांच्या बिझनेसला भेट दिली.
ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जाऊन स्वतःचं बिझनेस साम्राज्य उभं करणाऱ्या योगेश चव्हाण यांचं प्रवीण यांनी कौतुक केलंय.
योगेश यांच्यासोबतचा सविस्तर व्हिडिओ शेयर करत प्रवीण तरडेंनी त्यांच्याबद्दल कौतुक आणि अभिमान व्यक्त केलाय.
प्रवीण तरडे लिहितात.. "ॲास्ट्रेलियातील मराठीबाणा , ६५ किलो घरी बनवलेले फरसाण घेउन कराडचा योगेश चव्हाण हा मराठी तरूण ॲास्ट्रेलियात आला आणि आज ईथे वर्षाला ७० हजार किलोचा माल तो विकतोय ..
आता महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून त्याला उद्योजक तयार करायचेत.. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही त्याच्याशी संपर्क करू शकता", अशाप्रकारे भावना व्यक्त करत प्रवीण यांनी योगेश यांच्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
प्रवीण तरडे यांनी शेयर केलेल्या या व्हिडिओवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय. याशिवाय योगेश चव्हाण यांच्या व्यवसायाचं अनेकांनी कौतुक केलंय.
ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जाऊन तिथे स्वतःचा बिझनेस यशस्वी करून दाखवणाऱ्या योगेश चव्हाण यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. प्रवीण यांनी योगेश यांच्या फरसाण फॅक्टरीमधून फेरफटका मारून त्यांचं काम जाणून घेतलं