Pravin Tarde: स्वतःची काळजी घ्या.. दिग्दर्शक प्रवीण तरडेची सूचक पोस्ट.. येतोय नवा चित्रपट? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pravin Tarde shared post and said please take care this corona is very dangerous, it is hint of his upcoming movie?

Pravin Tarde: स्वतःची काळजी घ्या.. दिग्दर्शक प्रवीण तरडेची सूचक पोस्ट.. येतोय नवा चित्रपट?

pravin tarde : लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशी बहू ख्याती असलेले प्रवीण तरडे म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नाव. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं आहे.

'मुळशी पॅटर्न' असो 'धर्मवीर' किंवा 'हंबीरराव' प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांनी उचलून धरला आहे. विशेष म्हणजे आपली संस्कृती, परंपरा याविषयी ते भरभरून बोलत असतात. त्यांचे आपल्या गावावर, शेतीवर विशेष प्रेम आहे हेही त्यांच्या पोस्ट दिसून येते.

आज मात्र त्यांनी एक पोस्ट करून एका वेगळ्याच विषयावर लक्ष वेधले आहे. आज त्यांनी 'करोना' महामारी विषयी पोस्ट केली आहे. करोना स्थिती सुधारल्यानंतर जवळपास वर्षभराने त्यांनी करोनाविषयी का पोस्ट केली असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

2019 मध्ये आलेल्या करोना महामारीने जग हादरवून सोडलं.या महामारीत अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.त्यामुळे या काळात प्रत्येकजन एकमेकांना धीर देत होता.माणसांपासून लांब राहूनही सर्वजन एकमेकांना सांभाळत होते.त्यावेळी करोनाला मारण्यासाठी गरम पाणी प्या, चहा घ्या असे सल्ले दिले जायचे.असाच सल्ला आज प्रवीण तरडे यांनी दिला आहे.

त्यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये लिहिलं आहे की, ''गरम पाणी , चहा , काॅफी पीत रहा आणि एकटं राहून स्वत:ची काळजी घ्या ... हा कोरोना थोडा खतरनाक आहे दोस्तांनो..''

पण करोना महामारी समून गेल्या नंतर प्रवीण तरडे यांनी ही पोस्ट का शेयर केली असा प्रश्न अनेकांना पडला आहे. तशा कमेंटही नेटकऱ्यांनी केल्या आहेत. ‘’काही दिवस मागे गेले सर तुम्ही कामाच्या व्यापात..... थोड एक दोन वर्ष पुढे या... सरसेनापती सुद्धा प्रदर्शित झालेला आहे..’’ अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. तर काहींनी तुमचं अकाऊंट हॅक केलं आहे का असंही विचारलं आहे.  

परंतु हे करण्यामागे निश्चितच काहीतरी कारण असणार आहे. कदाचित प्रवीण तरडे लवकरच नवा चित्रपट घेऊन येणार आहेत. आता तो नेमका काय असेल, तो करोना महामारीवर असेल का हे मात्र लवकरच कळेल.