सोनमच्या लग्नाच्या धडाकेबाज संगीताची तयारी  

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 मे 2018

अनिल कपूर 2015 मध्ये प्रदर्शित झालेला "दिल धडकने दो' चित्रपटातील "गल्ला गोडियां...' गाण्यावर डान्स करणारेत, तर सोनमचे मित्र स्वॅग से करेंगे सबका स्वागतवर थिरकणारेत

बॉलीवूडची फॅशन आयकॉन सोनम कपूर आनंद आहुजासोबत 8 मे ला विवाहबंधनात अडकणार आहे. या ग्रॅण्ड पंजाबी लग्नसोहळ्याची तयारी सध्या जोरदार सुरू आहे.

 sonam kapoor anand ahuja

सोमवारी (ता. 7) संगीत सेरेमनीचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्यासाठी तिच्या घरातले फारच उत्सुक आहेत. तिचे नातेवाईक व मित्र मंडळी डान्स करणारेत. इतकंच नाही तर सोनमचे वडील म्हणजेच अनिल कपूरही संगीतमध्ये त्यांच्या गाण्यावर थिरकताना दिसणारेत.

 anil kapoor sonam kapoor

सूत्रांच्या माहितीनुसार, अनिल कपूर 2015 मध्ये प्रदर्शित झालेला "दिल धडकने दो' चित्रपटातील "गल्ला गोडियां...' गाण्यावर डान्स करणारेत, तर सोनमचे मित्र स्वॅग से करेंगे सबका स्वागतवर थिरकणारेत; तर सोनमची बहीण जान्हवी कपूर श्रीदेवीच्या गाजलेल्या गाण्यांवर म्हणजेच "मेरे हाथों में नौ नौ चुडियां है...' आणि "किसी के हाथ ना आएगी ये लडकी...' या गाण्यांवर थिरकणारेय. इतकंच नाही तर अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग एकत्र परफॉर्मन्स करणारेत. एकंदरीत सोनमच्या संगीत सोहळ्याची तयारी जोरदार सुरू असून तिचा हा सोहळा चर्चेचा विषय ठरणार हे नक्की! 

janhavi and sonam

arjun kapoor and sonam kapoor


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: preperation of sangeet ceremony of sonam kapoor