
‘हीच खरी नारीशक्ती’, द्रौपदी मुर्मू यांच्यासाठी कंगना रनौतची खास पोस्ट..
Kangana Ranaut : गेले काही दिवस देशात राष्ट्रपती पदी कोण बसणार याची चर्चा सुरू होती. एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे यशवंत सिन्हा यांच्यात चुरशीची लढत होती. पण आदिवासी समाजातून आलेल्या द्रौपदी मुर्मू यांचे पारडे सुरुवातीपासूनच जड होते. अखेर द्रौपदी मुर्मू या बहुमत सिद्ध करत राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या. त्यामुळे सध्या त्यांच्यावर सर्व क्षेत्रांतून, सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष अभिनेत्री कंगना रनौतने यासंदर्भात एक पोस्ट शेयर केले आहे.
(President Draupadi Murmu gets wishes from Kangana Ranaut)
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना 64 टक्के मतं तर यशवंत सिन्हा यांना 36 टक्के मतं मिळाली. संपूर्ण देशाचं लक्षया लढतीकडे लागळे होते. द्रौपदी या (Droupadi Murmu) राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असणार आहेत. या प्रसंगी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूडची ‘धाकड गर्ल’ अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranauat) हिने देखील द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
कंगनाने एक फोटो स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीत कंगनाने द्रौपदी मुर्मू यांचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच, विजयाबद्दल द्रौपदी मुर्मूचे अभिनंदन करताना कॅप्शनमध्ये 'नारी शक्तीचा विजय असो' असे तिने लिहिले आहे. 'आदिवासी समाजातून आलेली एक महिला देशातील सर्वोच्चपदी राष्ट्रपती म्हणून विराजमान होते ही मोठी बाब आहे शिवाय त्या देशाच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत,' असेही तिने म्हंटले आहे.

President Droupadi Murmu gets wishes from Kangana Ranaut
द्रौपदी मुर्मू या ओडिसातील आदिवासी नेत्या आहेत. ओडिशातील BJP-BJD युती सरकारमध्ये 2002 ते 2004 या काळात त्या मंत्री होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओडीसाच्या रायरंगपुर मधून 1997 मध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या. पुढे त्याच मतदारसंघातून त्या आमदार झाल्या. आदिवासी समाजातील राष्ट्रपती झालेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
Web Title: President Draupadi Murmu Gets Wishes From Kangana Ranaut
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..