प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांच्या वडिलांचं निधन

pritam
pritam

मुंबई- बॉलीवूड एकानंतर एक अशा दिग्गजांच्या निधनाने हादरुन गेलं आहे. नुकतीच अभिनेता वरुण धवनच्या मावशीच्या निधनाची बातमी समोर आली होती आणि आता वरुणच्या मावशीच्या निधनानंतर आता आणखी एका सेलिब्रिटींच्या वडिलांचं निधन झालं आहे.  बॉलीवूडचे प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांचे वडिल प्रबोध चक्रवर्ती यांचं आज सोमवारी निधन झालं. याबाबतची माहिती प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी त्यांच्या ट्वीटवरुन ट्वीट करत दिली आहे.

प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी सोशल मिडीयावर याबाबतची माहिती दिली आहे. कैलाश यांनी ट्वीट करत लिहिलंय, 'माझ्या मित्राच्या वडिलांना देवाज्ञा झाली आहे. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबाला हे दुःख पचवण्याची देव ताकद देओ. प्रीतम माझ्या भावा यावेळी देवाचं मनन करण्याचीच गरज आहे. ओम नमो शान्ति, हरि ओम' असं म्हणत कैलाश यांनी प्रीतम यांच्या वडिलांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

प्रसिद्ध संगीतकार प्रीतम चक्रवर्ती हे बंगाली कुटुंबातील आहेत. प्रीतम यांनी त्यांच्या संगीत प्रशिक्षणाची सुरुवात वडिल प्रबोध चक्रवर्ती यांच्याकडूनंच केली होती. प्रीतम यांनी शाळेत असतानाच गिटार वाजवणं सुरु केलं होतं. 

'दंगल', 'ऐ दिल है मुश्किल', 'धूम ३', 'वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई दोबारा', 'यारियां', 'दिलवाले', 'फैंटम', 'बजरंगी भाईजान', 'जब हॅरी मेट सेजल', 'जग्गा जासूस', 'ट्युबलाईट', 'राब्ता', 'कलंक' सारख्या अनेक सिनेमांना दिलेल्या संगीतासाठी प्रीतम ओळखले जातात.   

pritam chakraborty father prabodh chakraborty passed away  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com