"मायानगरी'त झळकणार प्रिया 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

"मायानगरी' हे एक राजकीय नाट्य असून, सत्तेसाठीची चढाओढ यात पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियासह अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, एजाज खान व सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

"काकस्पर्श', "वजनदार', "हॅप्पी जर्नी', "टाईमपास 2' व "आम्ही दोघी' यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी अभिनेत्री प्रिया बापट लवकरच वेब सीरिजमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजचं नाव "मायानगरी-सिटी ऑफ ड्रिम्स' असं आहे. यात ती महत्त्वाकांक्षी, कणखर अशा पौर्णिमा गायकवाड नावाच्या तरुणीची भूमिका साकारताना दिसणारेय.

mayanagari

"मायानगरी' हे एक राजकीय नाट्य असून, सत्तेसाठीची चढाओढ यात पाहायला मिळणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियासह अतुल कुलकर्णी, सचिन पिळगावकर, एजाज खान व सिद्धार्थ चांदेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. ऍपलाउज एण्टरटेन्मेंटनं या वेबसीरिजची निर्मिती केलीय तर दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागेश कुकुनूर यांनी केले आहे. या वेबसीरिजचे दहा भाग प्रदर्शित होणारेत.

याबद्दल प्रिया म्हणाली की, यापूर्वी मी केलेल्या भूमिकांपेक्षा मायानगरीमधील माझी भूमिका खूप वेगळी आहे. हे काम माझ्यासाठी आव्हानात्मक होते आणि ते मी छान केले असेन, अशी मला आशा आहे. या मालिकेतील सर्वच कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव माझ्यासाठी विशेष होता. नागेश कुकुनूर हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. माझ्या भूमिकेच्या अंतरंगात खोलवर शिरण्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाचा फार उपयोग झाला.' प्रियाची ही वेगळी भूमिका प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरते हे पाहावे लागेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: priya bapat in mayanagari city of dreams web series