प्रिया म्हणाली 'आय लव्ह यु मिस्टर कामत', शेअर केले खास फोटो !

वृत्तसंस्था
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

प्रियाने आणि उमेशने चित्रपटातून आणि वेब सिरिजमधून एकत्र काम केले आहे. या दोघांची ऑनस्क्रिन जोडी प्रेक्षकांची फेवरेट आहेच. पण, खऱ्या जीनवातील हे कपलही चाहत्यांच्या पसंतीमध्ये अव्वल आहे.

मुंबई : बॉलिवूडमध्ये अऩेक कपल आहेत ज्यांची फॅन फोलोइंग सर्वाधिक आहेत. पण, मराठी सिनेसृष्टीतील कपलही काही मागे नाहीत. मराठी इन्डस्ट्रीतल्या अनेक कपल्सची पसंतीही सर्वाधीक आहे आणि सोशल मीडियवर त्यांचे फोटो अनेकदा व्हायरल होत असतात. त्यातीलच एक कपल म्हणजे अभिनेत्री प्रिया बापट आणि उमेश कामत. हे दोघं ज्याप्रमाणे स्क्रीन शेअर करतात तसेच खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे साथीदार आहेत. उमेश कामतला वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 

Image may contain: 7 people, people smiling, text

प्रियाने आणि उमेशने चित्रपटातून आणि वेब सिरिजमधून एकत्र काम केले आहे. या दोघांची ऑनस्क्रिन जोडी प्रेक्षकांची फेवरेट आहेच. पण, खऱ्या जीनवातील हे कपलही चाहत्यांच्या पसंतीमध्ये अव्वल आहे. पती उमेशच्या वाढदिवसानिमित्त प्रियाने इन्स्टाग्राम स्टोरीवर काही खास आणि मजेशीर फोटो शेअर केले. 

Image may contain: 6 people, people smiling, text

या फोटोंमध्ये प्रिया आणि उमेश यांचे रोमॅंटीक तर काही मजेशीर फोटो आहेत. प्रिया आणि उमेश यांनी 2011 मध्ये लग्न केलं. त्यांनी 'टाइम प्लिज' हा सिनेमा एकत्र केला. त्यानंतर 'आणि काय हवं' या वेबसिरिजमधून प्रिया आणि उमेश एकत्र दिसले. या वेबसिरिजचा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Image may contain: 6 people, people smiling, text and close-up

प्रिया आणि उमेश सोशल मीडियावर अॅक्टीव असतात आणि एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. त्यांच्या फोटोंवर नेटकरी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव करत कौतुक करतात. उमेशने ये रे ये रे पैसा, असेही एकदा व्हावे, बाळकडू असे हिट सिनेमे केले. तर त्याचं 'दादा एक गुड न्युज आहे' हे नाटक खूप गाजलं. 

Image may contain: 4 people, people smiling, text

प्रिया बापटने टाइम प्लिज, टाइमपास 2, हॅपी जर्नी, वजनदार, काकस्पर्श असे सुपरहिट सिनेमे केले आहेत. नुकतचं ती हॉटस्टारच्या 'सिटी ऑफ ड्रिम्स' या वेबसिरिजमध्येही मुख्म भूमिकेत दिसली.  

प्रिया आणि उमेश यांच्या 'आणि काय हवं' या सिरिजला प्रचंड पसंती मिळाली. दुसऱ्या सिझनचं शुटींग पूर्ण झालं असून लवकरच तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priya bapat shares romantic photos of husband Umesh kamat