City Of Dreams : प्रिया बापटची पहिली वेब सिरिज ठरतेय ट्रेडींग गुगल सर्च

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मे 2019

प्रिया बापटला गोवा, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्येही गेल्या तीन दिवसात अधिक सर्च केलं गेलं आहे.

एखादी मराठमोळी अभिनेत्री सहसा बोल्ड समजल्या जाणाऱ्या वेब सिरिजच्या पॅटर्नमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे म्हटल्यावर आपल्या भोवया जरा उंचावल्याच. त्यात ती अभिनेत्री होती प्रिया बापट. तिची पहिलीवहिली हिंदी भाषिक वेब सीरिज ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 

'हॉटस्टार'वरील ही वेब सीरिज आणि त्यातील प्रियाचा 'बोल्ड सीन' सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पण केवळ महाराष्ट्रातच नव्हे बरं का. तर देशभर गुगलवर प्रिया बापट आणि ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ हे दोन कीवर्ड सर्च होत आहेत. 

'गुगल ट्रेण्ड'नुसार 3 मेपासून प्रिया बापट नावाचा सर्च वाढला आहे. याच दिवशी ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती आणि त्यातील बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला. तेव्हापासूनच प्रियाला गोवा, कर्नाटक, तेलंगणा या राज्यांमध्येही गेल्या तीन दिवसात अधिक सर्च केलं गेलं आहे. महाराष्ट्रात तिला सर्वाधिक सर्चमध्ये छत्तीसगडचे नाव पुढे आले आहे. 

city of dreams

अभिनेत्री गीतिका त्यागी सोबत प्रिया रोमान्स करताना या सीनमध्ये दिसत आहे. तिला ट्रोलही केलं जातंय. पण गुगलवर तिला तितकंच सर्चसुद्धा केलं जातंय. या सीरिजमध्ये प्रिया पूर्णिमा गायकवाड ही भूमिका साकारत आहे. नागेश कुकुनूर दिग्दर्शित ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या सीरिजला राजकारणाची पार्श्वभूमी आहे.

priya bapat


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priya Bapats first web series City Of Dreams is Trending on Google search