प्रिया वॉरीयरची पुन्हा एकदा दिलखेच अदा...

सोमवार, 16 एप्रिल 2018

आता हिच कमाल पुन्हा एकदा बघण्यासाठी सज्ज व्हा. कारण एका जाहीरातीमधून ती पुन्हा आपल्या अदांनी घायाळ करणार आहे.  

तुम्हाला प्रिया वॉरीयर आठवते? हो, तीच जिची अदा रातोरात व्हायरल झाली होती आणि एका दिवसात प्रिया प्रकाश वॉरीयर हे नाव प्रत्येकाच्या ओठांवर होते. तिचा आगामी सिनेमा 'ओरु अदार लव्ह'च्या गाण्याचील एक दृश्य व्हायरल झाले होते. ज्यात प्रियाने आपल्या अदांची कमाल दाखवली आहे. आता हिच कमाल पुन्हा एकदा बघण्यासाठी सज्ज व्हा. कारण एका जाहीरातीमधून ती पुन्हा आपल्या अदांनी घायाळ करणार आहे.  

ही जाहीरात नेल्से मन्च या चॉकलेटची आहे. मल्याळम, तमिळ आणि हिंदी आणखी दोन भाषेतून ही जाहीरात प्रदर्शित झाली आहे. या जाहीरातीच्या व्हिडीओला आतापर्यंत 1 लाखापेक्षा जास्त पाहिले गेले आहे. प्रियाच्या आधीच्या गाण्याप्रमाणे या जाहीरातीचा व्हिडीओ जरी इतका व्हायरल झाला नसला तरी जाहीरातीच्या व्हिडीओला यु ट्युबवर चांगल्या कमेंट्स येत आहेत. या व्हिडीओची ही झलक...

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priya Varrier Winked Again And The Internet Is Utterly Obsessed

टॅग्स