प्रियांकापेक्षा दीपिकाच सरस 

वृत्तसंस्था
गुरुवार, 1 जून 2017

प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण या दोघींनीही बॉलीवूडच नाही तर हॉलीवूडमध्येही आपली छाप पाडली आहे.

क्वांटिकोमधून प्रियांकाने आपल्या अभिनयाने सगळ्यांना आपलेसे केले; तर दीपिकाच्या "एक्‍सएक्‍सएक्‍स-रिटर्न ऑफ क्‍झॅंडर केज' या पहिल्याच हॉलीवूडपटातून सगळ्यांची वाहवा मिळवली. या दोघींमधली स्पर्धा अभिनयापुरतीच राहिलेली नसून हॉलीवूडच्या "मॅक्‍झिम' या मॅगझिनच्या 100 सेक्‍सिएस्ट वूमन इन वर्ल्डमध्येही दोघींनी आपला झेंडा फडकावला आहे.

मेट गाला, कान्समधल्या दीपिकाच्या लूक्‍सवरून अनेकांनी तिची खिल्ली उडवली होती. पण मॅक्‍झिमच्या या रेसमध्ये दीपिकाने प्रियांकाला मागे टाकले आहे. दीपिका सगळीकडेच बाजी मारत आहे. फोर्ब्स मॅगझिनच्या लिस्टमध्येही दीपिका सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींच्या लिस्टमध्ये दहाव्या स्थानावर आहे. त्यामुळे सध्या प्रियांकापेक्षा दीपिकाच सरस आहे, असे म्हणायला हरकत नाही. 

Web Title: priyanka and deepika