प्रियांका आणि परिणीती झळकणार एकाच चित्रपटात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑक्टोबर 2019

या दोघीही एका हॉलीवूड चित्रपटात एकत्र काम करणार आहेत.

मुंबई : अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा या बॉलीवूडमधील गुणी बहिणी म्हणून ओळखल्या जातात. बॉलीवूडमध्ये अनेक वर्ष एकत्र काम करताना या दोघींनी आजवर कधीही एकत्र काम केलेले नाही.

आता लवकरच दोघीही ‘फ्रोजन २’ या हॉलीवूड चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आल्या आहेत. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी या दोघींनी डबिंग केले आहे. परिणीतीने ॲना या पात्रासाठी आपला आवाज दिला आहे, तर प्रियांकाने एल्सा या पात्रासाठी आपला आवाज दिला आहे. पहिल्यांदाच दोघींना एकत्र काम करताना पाहून चाहते खूश आहेत.

web title : Priyanka and Parineeti will be featured in the same film


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka and Parineeti will be featured in the same film