अशी साकारली वेश्‍येची भूमिका... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियंकाला खूप मेहनत घ्यावी लागली. याबाबत ती सांगते की, या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी मला सोळा तास लूकसाठी खर्च करावे लागले.

ऑस्ट्रेलियन चित्रपट 'लॉयन'मध्ये एक वयस्कर आई व 'हाफ तिकीट' या मराठी चित्रपटातील आईची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियंका बोस एका नव्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारेय. ती 'आश्‍चर्य फ**इट' सिनेमात बोल्ड व तरुण वेश्‍येच्या भूमिकेत दिसणार आहे.

लेखक सादत हसन मंटो यांच्या कथेतून प्रेरणा हा सिनेमा घेऊन बनविण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा एक बॉलीवूड स्टार, त्याचा ड्रायव्हर, एक वेश्‍या व तिच्या दलालावर आधारित आहे. या चित्रपटातील भूमिकेसाठी प्रियंकाला खूप मेहनत घ्यावी लागली. याबाबत ती सांगते की, या चित्रपटातील व्यक्तिरेखेसाठी मला सोळा तास लूकसाठी खर्च करावे लागले. ही एक गंभीर भूमिका असून हे पात्र समजून घेण्यासाठी दिग्दर्शकाने क्रिएटिव्ह चर्चेव्यतिरिक्त कित्येक वेळा पटकथा माझ्याकडून वाचून घेतली. त्यामुळे ही भूमिका साकारणं सोपं झालं.'  

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Priyanka Bose Starer Ascharya Fuck It new hindi movie coming soon