
Priyanka Chaudhari : बिग बॉस फेम प्रियंका चहर चौधरीवर गुन्हा दाखल होणार ? या प्रसिद्ध मॉडेलने केलाय चोरीचा आरोप..
बिग बॉस 16 फेम प्रियांका चहर चौधरी ही सध्यो सोशल मिडियावर बरिच चर्चेत आहे. बिग बॉसच्या शोमध्ये ती नेहमीच आपले मुद्दे ठामपणे मांडायची त्यामुळे ती सर्वांची चाहती होती.
बिग बॉसमध्ये आल्यानंतर प्रियांकाने प्रेक्षकांची मने जिंकली. टीव्ही अभिनेत्रीची स्टाइल बीबीच्या घरात चांगलीच आवडली होती. गेल्या काही दिवसांपासून प्रियांका कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत आहे. मात्र आता तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ती यावेळी वादात सापडली आहे.
अलीकडेच प्रसिद्ध मॉडेल आणि प्रभावशाली अभिनेत्री इशिता गुप्ताने प्रियंका चहर चौधरीवर गंभीर आरोप केले आहेत. त्याचवेळी, आता याबाबत तिने प्रियंकाला धमकीही दिली आहे.
इशिताने दावा केला होता की प्रियंका चहर चौधरीने परिधान केलेला बेज रंगाचा रफल लेहेंगा तिच्या ब्रँडचे कपडे आहेत, जे तिने खास डिझाइन केले होता.
परदेशी स्थायिक फॅशन स्टायलिस्ट आणि डिझायनर इशिताने प्रियंका चहरवर एका ट्विटमध्ये आरोप केले, " एक साइकॉटिक पीआर टीम असलेली वेडी महिला जी इतरांना त्रास देणं थांबवू शकत नाही. ही विषाची व्याख्या आहे. इतरांना प्रभावित करण्यासाठी तिने खोट व्यक्तिमत्त्व तयार केले.
इशिताने पुढे लिहिले, “तिला वाटते की माझ्यासारखे दिसण्याचा प्रयत्न करून किंवा माझ्या क्लोनसारखे कपडे घालून ती माझ्यासारखी बनू शकते. होय कदाचित एक अब्ज पुनर्जन्मानंतर. माझे 30 हजार पौंड किमतीचे कपडे चोरले. मी काहीच बोलले नाही."

इशिताने तिच्या पुढच्या ट्विटमध्ये लिहिले, तिने कपडे तर चोरले आहेत. त्याबद्दल मी तिला चागंलच सुनावलही आहे. पण तिचा शत्रू कोण आहे हे मला माहीत नाही. त्यावर मी आता भाष्य करणार नाही. ब्लॉक केल्यानंतर, जर ती मला स्टक किंवा माझी कॉपी करत राहिली, तर ही तिची समस्या आहे. असे वाटतं की तिचे बरेच शत्रू आहेत." तर नाही.
दुसर्या ट्विटमध्ये इशिताने लिहिले की, ती सध्या देशाबाहेर आहे पण लवकरच परत आल्यावर प्रियांकावर नक्कीच गुन्हा दाखल करणार आहे. तर दुसरीकडे या संपूर्ण वादावर प्रियंका चहर चौधरी यांचे कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.